मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : पुण्यात सावकारीचा जाच; ३० हजाराच्या कर्जावर मागितले १ लाखाचे व्याज

Pune Crime : पुण्यात सावकारीचा जाच; ३० हजाराच्या कर्जावर मागितले १ लाखाचे व्याज

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Jun 23, 2022 07:46 PM IST

एकाने आपल्या भावाच्या आजारपणासाठी कर्ज स्वरुपात घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या बदल्यात खासगी सावकाराने या रक्कमेवर तब्बल १ लाख रुपयांचे व्याज मागितले. एवढेच नाही तर त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली.

Pune Crime
Pune Crime (HT_PRINT)

Pune Crime : सावकारीच्या जाच्याला कंटाळून एका कुटुंबातील ९ व्यक्तींनी आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांनाच पुण्यातही सावकारी त्रासाची घटना पुढे आली आहे. एकाने आपल्या भावाच्या आजारपणासाठी कर्ज स्वरुपात घेतलेल्या ३० हजार रुपयांच्या बदल्यात खासगी सावकाराने या रक्कमेवर तब्बल १ लाख रुपयांचे व्याज मागितले. एवढेच नाही तर त्याला जीवे मारण्याची धमकीही दिली. या प्रकरणी या सावकाराला अटक करण्यात आली आहे.

सतीश बन्सिलाल भाटी (वय ५४ रा. भवानी पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला २७ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी एका तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणाने भावाच्या औषधोपचारासाठी भाटी याच्याकडून दरमहा १५ टक्के व्याजदराने ३० हजारांची रक्कम घेतली होती. कर्ज घेताना दुचाकीची कागदपत्रे आणि दोन धनादेश तारण म्हणून भाटीला दिले होते. असे असतांनाही आरोपीने या रक्कमेवर भाटी याने त्याच्या साथीदारासह फिर्यादीच्या घरी जात २२ महिन्यांचे व्याज आणि मूळ अशा एक लाख २९ हजारांची मागणी केली. एवढच नाही तर मारहाण करत रक्कम न दिल्यास कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी भाटीने तरुणाने दिलेल्या धनादेशाद्वारे १९ हजार रुपये काढूनही घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या युनिट एक शाखेने आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या दुकानासह घरामध्ये ६४ धनादेश, बँकेचे १६ पासबुक, मोबाइल असा १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, त्याला पुढील तपासासाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग