मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : परकीय चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने वृद्धाला गंडवले; एकाला अटक
Maharashtra Crime News
Maharashtra Crime News (HT_PRINT)

Pune Crime : परकीय चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने वृद्धाला गंडवले; एकाला अटक

18 August 2022, 20:24 ISTNinad Vijayrao Deshmukh

पुण्यात एका वृद्धाला परकीय चलनात गुंतवणूक करण्याच्या आमिषाने साडेचार लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

पुणे : पुण्यात एका वृद्धाला परकीय चलनात गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ नागरिकाची साडेचार लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी अहमदाबादमधून येरवडा पोलिसांनी एकास अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला १९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले.

ट्रेंडिंग न्यूज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शशांक दिनेशभाई पराडिया (वय २८, रा. अहमदाबाद) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पराडिया याच्यासह त्याच्या काही साथीदारांनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने दिलेल्या फिर्यादीनुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर संपर्क साधत फॉरेक्स फॅक्टरी करन्सी ब्रोकर असल्याची बतावणी या वृद्धाला केली. परकीय चलनात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवत ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या बँक खात्यात २ लाख ८ हजार ५०० रुपये आरोपींच्या बँक खात्यात जमा केली. 

गुंतवणूक केलेल्या रक्कमेवरील परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपींनी एकूण मिळून ४ लाख ४२ हजार ७५५ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी तपास करुन पराडियाला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग