मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : सख्खे भाऊ पक्के वैरी! घर नावावर करण्यासाठी छळणाऱ्या भावाचा बहीण-भावाने केला खून

Pune Crime : सख्खे भाऊ पक्के वैरी! घर नावावर करण्यासाठी छळणाऱ्या भावाचा बहीण-भावाने केला खून

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 02, 2022 04:09 PM IST

पुण्यात घरासाठी भांडणाऱ्या एका भवांचा दोन बहीण-भावांनी मिळून खून केल्याची धक्कादायक घटना पाच वर्षांनी उघडकीस आली आहे.

Crime News
Crime News (HT_PRINT)

पुणे : पैशांसाठी आणि मालमत्तेसाठी सख्ये भाऊ एकमेकांच्या जिवावर उठत असतात. अशीच एक घटना पुणे शहरात उघडकीस आली आहे. राहते घर स्वत:च्या नावावर करुन देण्याकरिता सातत्याने तगादा लावणाऱ्या सख्ख्या भावाचा सख्ख्याभावाने आणि बहीणीने मिळून साथीदारांच्या मदतीने खून केल्याची बाब पोलिसांच्या चौकशीत पाच वर्षानंतर उघडकीस आली आहे. याप्रकरणी चार आरोपींवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पंकज दिघे (रा.पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याचा भाऊ सुहास दिघे, बहीण अश्विनी अडसूळ, प्रशांत व महेश बाबुराव धनावडे (वय ३७,रा. शिवणे,पुणे) या आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश धनावडे यास अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित पसार झालेल्या आरोपींचा शोध घेत आहेत. ही घटना १४/३/२०१७ ते १८/३/२०१७ यादरम्यान घडली. याबाबत गुन्हे शाखा युनिट तीनचे पाेलीस हवालदार राजेंद्र नारायण मारणे (वय ५१) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. उघडकीस न आलेल्या गुन्हयांचा तपास युनिट तीनचे पथक करत असताना, त्यांना या गुन्ह्यातील कागदपत्रे प्राप्त झाली होती. चौकशीत प्राप्त झालेली कागदपत्रे व साक्षीदार यांचेकडे केलेल्या तपासतून खून झालेला पंकज दिघे हा त्याचा भाऊ सुहास दिघे व बहीण अश्विनी अडसुळ यांच्याकडे राहते घर स्वत:च्या नावावर करण्याकरिता त्रास देत होता. त्याकारणावरुन त्यांनी १४/३/२०१७ रोजी सायंकाळचे सुमारास पंकज यास आरोपींनी संगनमताने कट रचून बेदम मारहाण केली. त्यानंतर महेश धनावडे याने तवेरा गाडीत पंकज यास नेवून फुरसुंगी गावातील शिवशंभो देवस्थान ट्रस्टच्या उसाच्या शेताजवळ असलेल्या कलव्यात ढकलुन दिले होते. याबाबतची माहिती आरोपींना माहिती असताना ही त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी १९/३/२०१७ रोजी डेक्कन पोलिस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार १९/३/२०२२ दिली. मात्र, पोलिस चौकशीत पंकज याचा मृतदेह १८/३/२०१७ रोजी कलव्यात सापडला. यामुळे आरोपींवर संशय बळावला. त्यामुळे याबाबत सखोल तपास केला असता आरोपींनी कट रचून पंकज यास पाण्यात ढकलुन देवुन जीवे ठार मारले असल्याची कबुली दिली आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग