मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : पुण्यात जांभुळवाडी दरी पुलावर मोठा अपघात; ८ ते १० गाड्या एकमेकांना धडकल्या, १० ते १२ जण जखमी
जांभूळवाडी येथील दरी पुलावर पाठीमागून धडकलेली ट्रॅव्हल्स
जांभूळवाडी येथील दरी पुलावर पाठीमागून धडकलेली ट्रॅव्हल्स

Pune Accident : पुण्यात जांभुळवाडी दरी पुलावर मोठा अपघात; ८ ते १० गाड्या एकमेकांना धडकल्या, १० ते १२ जण जखमी

07 November 2022, 21:30 ISTNinad Vijayrao Deshmukh

Pune Accident news : पुण्यातील नव्या कात्रज बोगद्याकडे जाणाऱ्या जांभुळवाडी येथील दरी पुलावर मोठा अपघात झाला आहे. एक ट्रॅव्हल एका कंटेनरला धडकली. त्या पाठोपाठ १० ते १२ वाहने एकमेकांना धडकली आहेत. यात १२ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

पुणे : पुण्यातील कात्रज येथील नव्या बोगद्याकडे जाणाऱ्या जांभूळवाडी येथील दरी पुलावर तब्बल १० ते १२ वाहने ही एकमेकांना धडकुन मोठा अपघात झाला आहे. या घटनेत तब्बल १२ ते १३ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सातारा येथून मुंबईला जाणारी एक ट्रॅव्हल्स ही कंटेनरला धडकुन त्या पाठोपाठ तब्बल १० ते १२ वाहने ही एकमेकांना धडकली. यात अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पुणे बंगळुरू मार्गावर कात्रज येथील नव्या बोगद्याच्या आधी जांभूळवाडी येथे दरी पूल आहे. या ठिकाणी तीव्र वळण आहे. सातारा बाजूने येणारी एक भरधाव वेगातील मुंबईला जाणारी एक ट्रॅव्हल्स ही या मार्गावरच एका कंटेनरला मागून धडकली. यावेळी मागून येणाऱ्या १० ते १२ गाड्या या देखील भरधाव वेगात असल्याने एकमेकांना धडकल्या. यात अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या मुळे १२ ते १३ जण जखमी झाले आहे.

अपघातानंतर लागलेल्या वाहनानांच्या रांगा
अपघातानंतर लागलेल्या वाहनानांच्या रांगा

पूलावरच हा अपघात झाल्याने या मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली आहे. वाहनानांच्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागल्या आहेत. पोलिस घटनास्थळी पोचले असून बचाव कार्य सुरू आहेत. काही जखमींना जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले आहे. या मार्गावरील वाहतूक ही सुरुळीत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

 

 

विभाग