मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Accident : हृदय प्रत्यारोपणासाठी नेणाऱ्या रुग्णवाहिकेचा टायर फुटला; अपघात दोन डॉक्टर जखमी

Pune Accident : हृदय प्रत्यारोपणासाठी नेणाऱ्या रुग्णवाहिकेचा टायर फुटला; अपघात दोन डॉक्टर जखमी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 31, 2022 06:40 PM IST

Pune news : कोल्हापूर येथून प्रत्यारोपणसाठी हृदय आणणाऱ्या रुग्णवाहिकेचा टायर पुटल्याने रुग्णवाहिका पलटी झाली. ही घटना पुणे सातारा मार्गावर किकवी येथे घडली.

पुणे रुग्णवाहिका अपघात
पुणे रुग्णवाहिका अपघात

पुणे : कोल्हापूर येथून प्रत्यारोपणसाठी हृदय आणणाऱ्या रुग्णवाहिकेचा टायर पुटल्याने रुग्णवाहिका पलटी होऊन अपघात झाला. ही घटना पुणे सातारा मार्गावर किकवी येथे ११.४५ च्या सुमारास घडली. या घटनेत दोन डॉक्टर जखमी झाले आहे. स्थानिकांनी त्यांच्या जवळील रुग्णवाहिका देऊन तातडीने जखमी डॉक्टर आणि हृदय पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात पाठवल्याने एका रूग्णाचा जीव वाचला.

रुबी हॉल रुग्णालयात एका रुग्णावर हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया होणार होती. यासाठी कोल्हापूर येथून एका दात्याने दिलेले हृदय हे दोन डॉक्टरांचे पथक पुण्यात घेऊन येत होते. ते कोल्हापुर येथून पुणे बंगलोर मार्गाने पुण्यात येत असताना भोर तालुक्यातील किकवी जवळ या रुग्णवाहिकेचा पुढचा टायर फुटला. रुग्णवाहिका वेगात असल्याने ती महामार्गावरच पलटी झाली. यात रुग्णावहिकेतील पाच व्यक्ती किरकोळ जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच PMRDA नांदेड सिटी अग्निशमन दलाची वाहने ही घटनास्थळी तातडीने पोहचली.

किकवी येथील नरेंद्र महाराज नानिज या संस्थेची ॲम्बुलन्स व चालक तुळशीराम रघुनाथ अहिरे यांनी त्यांच्याकडील ॲम्बुलन्स देऊन पलटी झालेल्या ॲम्बुलन्समधील हृदय व डॉक्टरांना घेऊन त्यांना रुबी हॉल येथे सोडलेले आहे. जखमीनवर उपचार करण्यात आले आहे.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग