मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Railway Mega block : बदलापूर येथील पूल पाडण्यासाठी रेल्वेचा शनिवारी, रविवारी विशेष ब्लॉक; काही लोकल रद्द

Mumbai Railway Mega block : बदलापूर येथील पूल पाडण्यासाठी रेल्वेचा शनिवारी, रविवारी विशेष ब्लॉक; काही लोकल रद्द

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 17, 2023 08:00 AM IST

Mumbai Railway Mega block : रात्रीच्या काही लोकल गाड्या पुढील पाच दिवस रद्द करण्यात आल्या असतांनाच आता शनिवारी आणि रविवारी देखील बदलापूर येथील पूल पडण्यासाठी रेल्वेने विशेष ब्लॉक ठेवला आहे.

Mumbai Railway Mega Block
Mumbai Railway Mega Block

 मुंबई : रेल्वे लाइनच्या दुरुस्तीसाठी रात्रीच्या ब्लॉक अंतर्गत काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असताना आता बदलापूर स्थानकातील सार्वजनिक पादचारी पूल पाडण्यासाठी रविवारी आणि शनिवारी विशेष ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.

बदलापूर येथील स्थानकातील सार्वजनिक पादचारी पूल पाडण्यासाठी नेरळ येथे पादचारी पुलाचे गर्डर्स लाँच करण्यासाठी दोन दिवस मध्यरात्री विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरील काही लोकल फेऱ्या या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही एक्सप्रेस गाड्यांचे मार्ग देखील बदलण्यात आले आहेत. शनिवारी आणि रविवारी जर बाहेर पडण्याचे नियोजन असेल तर लोकलचे वेळापत्रक पाहून बाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

असा असेल विशेष मेगा ब्लॉक

स्थानक – अंबरनाथ ते वांगणी

मार्ग – अप आणि डाऊन

वेळ – मध्यरात्री १.२५ ते पहाटे ३.५५ पर्यंत (शनिवार मध्यरात्र )

स्थानक – वांगणी ते भिवपुरी रोड

मार्ग – अप आणि डाऊन

वेळ - मध्यरात्री ०१.४० ते पहाटे ०३.३०

कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत

शनिवार रात्री १२.२४ ची सीएसएमटी कर्जत लोकल अंबरनाथ स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे. ही लोकल अंबरनाथ ते कर्जतदरम्यान रद्द राहणार आहे.

मध्यरात्री २.३३ ची कर्जत सीएसएमटी लोकल अंबरनाथ स्थानकातून चालवण्यात येईल.

या एक्स्प्रेस कर्जत-पनवेल-दिवा मार्गे

(११०२०) भुवनेश्वर-मुंबई कोणार्क, (१२७०२) हैद्रराबाद-मुंबई आणि (१८५१९) विशाखापट्टणम-एलटीटी या एक्स्प्रेस कर्जत-पनवेल-दिवा मार्गे चालविण्यात येणार आहे. कल्याणला जाणाऱ् प्रवाशांसाठी पनवेल आणि दिवा येथे या गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे. यामुळे या गाड्या १५ मिनिटे विलंबाने धावणार आहेत. (१११४०) गदग-मुंबई एक्स्प्रेस वांगणी स्थानकात थांबवण्यात येणार असल्याने ही गाडी २० मिनिटे विलंबाने मुंबईत दाखल होईल.

IPL_Entry_Point