मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jammu Kashmir Earthquake : जम्मू आणि काश्मीर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं ! ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे बसले धक्के

Jammu Kashmir Earthquake : जम्मू आणि काश्मीर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं ! ३.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे बसले धक्के

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 17, 2023 07:17 AM IST

Earthquake In India : तुर्की आणि सिरिया येथील भूकंपाची घटना ताजी असतांनाच भारतात जम्मू आणि काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्क बसले आहेत. तब्बल ३.६ रिश्टर स्केलचे एवढी तीव्रता या भूकंपची नोंदवली गेली.

Earthquake
Earthquake (HT)

Earthquake In Jammu : जम्मू आणि काश्मीर आज पहाटे भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. तब्बल ३.६ रिश्टर स्केल एवढी तीव्रता या भूकंपाची भूकंप मापकावर नोंदवली गेली. जम्मू काश्मीरच्या कटरा येथून तब्बल ९७ किलोमीटर अंतरावर हे धक्के शुक्रवारी सकाळी पहाटे ५.०१च्या सुमारास जाणवले. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

जम्मू काश्मीर येथे झालेल्या भूकंपाचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार त्यांनी हे वृत्त दिले आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातही काही दिवसांपूर्वी भूकंपाचे धक्के जाणवले होते. तब्बल ३.६ रिश्टर स्केलवर एवढी त्याची तीव्रता होती. सुदैवाने या घटनेत काही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही.

दरम्यान, तुर्की येथील भूकंपाची घटना ताजी असतांना जम्मू भूकंपाच्या धक्क्याने हादरल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. काही नागरिक घाबरून हे घराबाहेर पडले होते. सुदैवाने भूकंपाची तीव्रता जास्त नव्हती. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नगिरीक दहशतीत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग