मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nirmala Sitaraman : बारामतीबाबत दिल्लीतून कोणतीही तडजोड होणार नाही; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची ग्वाही

Nirmala Sitaraman : बारामतीबाबत दिल्लीतून कोणतीही तडजोड होणार नाही; केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांची ग्वाही

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 22, 2022 03:14 PM IST

Nirmala Sitaraman in Baramati : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज बारामती लोकसभा मतदार संघाच्या मंडल अध्यक्ष आणि जिल्हा पदाधिकारी यांच्या संघटनात्मक कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी बारामतीबाबत दिल्लीतून कुठलीही तडजोड होणार नाही याची ग्वाही त्यांनी दिली.

 Union Finance Minister Nirmala Sitaraman
Union Finance Minister Nirmala Sitaraman (PTI)

पुणे : २०२४ च्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी आता पासूनच कामाला लागावे. या साठी केंद्राच्या योजना जनतेपर्यंत पोहचवा. बारामती मतदार संघातील बनावट मतदार कमी करा तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांना आपले करून घ्या. बारामतीबाबत दिल्लीतून कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही, अशी ग्वाही खुद्द केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली.

बारामती लोकसभा मतदार संघाच्या मंडल अध्यक्ष आणि जिल्हा पदाधिकारी यांच्या संघटनात्मक कार्यक्रमात केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन बोलत होत्या. सीतारामन याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात विजय मिळविण्यासाठी भाजप तर्फे हाती घेतण्यात आलेल्या मोहिमे अंतर्गत त्यांनी बारामती मतदार संघाला भेट दिली. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यंची संवाद साधला.

सीतारामन म्हणाल्या, ‘ बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली, की आपला पक्ष बारामतीमध्ये बचावात्मक आहे. राष्ट्रवादीचे नेते भ्रष्टाचार केल्याने तुरुंगात गेले आहेत. बारामतीमधील कित्येक गावात पाण्याची समस्या आहे. हे प्रश्न आक्रमकपणे मांडा. यासह बारामती जिंकण्यासाठी या लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघातील बोगस मतदार कमी करा. पक्षाच्या केंद्रीय स्तरावर आणि दिल्लीतून बारामतीबाबत कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी संभ्रमात राहू नये. आतापासून २०२४ च्या तयारीला लागा’, अशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.

आमदार राहुल कुल म्हणाले, केंद्रीय नेते बारामतीमध्ये येऊन बारामती मॉडेलचे कौतुक करतात, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. यामुळे या मॉडेला भाळून जण्यापेक्षा आक्रमकपणे येथील समस्या मांडा असे कुल म्हणाले.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग