मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शिंदे गटाला ‘शिवसेना’ नाव मिळणे अशक्य; नीलम गोऱ्हेंनी सांगितली कायदेशीर बाजू

शिंदे गटाला ‘शिवसेना’ नाव मिळणे अशक्य; नीलम गोऱ्हेंनी सांगितली कायदेशीर बाजू

HT Marathi Desk HT Marathi
Jun 24, 2022 10:18 PM IST

शिंदे गटाला कायद्यानुसार 'शिवसेना' हे नाव मिळणार नाही, असं विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं.

Nilam Gorhe, Deputy Chairperson, Maharashtra Legislative Council
Nilam Gorhe, Deputy Chairperson, Maharashtra Legislative Council

एकनाथ शिंदे यांच्या फुटीर गटाला ‘शिवसेना’ हे नाव मिळणार, ‘धनुष्यबाण’ हे चिन्हही मिळणार अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. खासकरून आसामची राजधानी गुवाहाटीत मुक्कामी शिंदे गटाच्या सूत्रांकडून याबाबत ठामपणे माहिती दिली जात आहे. मात्र विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Nilam Gorhe on Maharashtra Political Crisis) यांनी मात्र ही खोटी माहिती पसरवली जात असल्याचं सांगत या मुद्दाची कायदेशीर बाजू स्पष्ट केली. शिवसेना जिल्हाध्यक्षांच्या बैठकीला मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘घटनेतील शेड्युल १० नुसार ज्यावेळेला एखाद्या पक्षामधले आमदार स्वत:चा गट तयार करतात तेव्हा त्यांना कायदेशीर मान्यता मिळते. म्हणून शिवसेनेतून फुटलेल्या गटाच्या सदस्यांना त्यांची आमदारकी टिकवायची असेल तर कोणत्यातरी एका पक्षात विलीन होणे गरजेचे असते. एकतर या गटाला भारतीय जनता पक्षामध्ये किंवा बच्चू कडूंच्या प्रहार पक्षात तरी विलीन व्हावे लागेल. कायद्यानुसार दुसऱ्या पक्षात विलीन झाल्यानंतर मूळ पक्षाच्या ४ टक्के एवढी मते मिळाल्यानंतर मूळ पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हाची मागणी करता येते.’ असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

शिवसेनेच्या बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यावरही त्यांनी टीका केली. एकनाथ शिंदे यांच्या फुटीर गटाने शिवसेनेला मिळालेल्या मतांपैकी एकूण चार टक्के काय, एकूण चार मते मिळवून दाखवावी, असं आव्हान नीलम गोऱ्हे यांनी यावेळी केलं. शिवसेनेची स्वतंत्र घटना आहे. ती निवडणूक आयोगानुसार तयार करण्यात आलेली आहे. शिवसेनेचा विधीमंडळ पक्ष वेगळा आणि मूळ पक्ष वेगळा असल्याची माहिती गोऱ्हे यांनी दिली.

शिवसेनेतून बाहेर पडलेले पराभूतच झाल्याचा इतिहास

नीलम गोऱ्हे म्हणाल्या की यापूर्वी जे-जे नेते आत्तापर्यंत शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी राजकारणात पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते पराभूत झाले आहेत. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडल्यानंतर सोबत गेलेले सर्व जण त्यांना सोडून गेले होते. खुद्द छगन भुजबळ यांनी सभागृहात ही माहिती दिली होती, याची आठवण नीलम गोऱ्हे यांनी करून दिली.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या