मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Metro : नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच होणार साकार.. वाचा किती असेल तिकीट दर अन् कसा असेल मार्ग

Mumbai Metro : नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच होणार साकार.. वाचा किती असेल तिकीट दर अन् कसा असेल मार्ग

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Oct 08, 2023 06:25 PM IST

Navi Mumbai metro news : पनवेल व बेलापूरसह नवी मुंबईतून मुंबई गाठणे आणखी सोपे होणार आहे. नवी मुंबई ते मुंबई मार्गावर लवकरच मेट्रो सुरू आहे.

Mumbai metro
Mumbai metro

Navi Mumbai Metro: पनवेलहून मुंबईला पोहोचणे आता फास्ट होणार आहे. त्याच बरोबर नवी मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. विजयादशमीच्या आधी म्हणजे नवरात्रोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे. मात्र,  उद्घाटन सोहळ्याची तारीख अद्याप निश्चित्त करण्यात आलेली नाही. पंतप्रधान कार्यालयाकडून याची घोषणा करण्यात आलेली नाही. 

ट्रेंडिंग न्यूज

नवी मुंबई पोलीस, सिडको आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत मेट्रोचे उद्घाटन १४ किंवा १५ ऑक्टोबर रोजी केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बेलापूर ते पेंढर पर्यंत ११ किमी पर्यंतचा मेट्रोचा पहिला टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावरील मेट्रोचे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. मेट्रो सुरू करण्यासाठी ऑक्टोबर २०२१ मध्ये सीएमआयईएस प्रमाणपत्र मिळाले होते. मात्र विविध कारणांमुळं या मार्गावर मेट्रो सुरू होऊ शकली नाही. या दरम्यान सेंट्रल पार्क आणि बेलापूर स्थानकात अपूर्ण राहिलेले कामदेखील पूर्ण झाले आहे. 

२१ जून रोजीच रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सिडकोला मेट्रोची प्रवासी सेवा सुरू करण्याचे प्रमाणपत्र दिले होते. त्यामुळे बेलापूर ते पेंढरपर्यंत मेट्रो सेवा सुरू केली जाऊ शकते. तशी तयारीही मेट्रोने सुरू केली आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च ३०६३  कोटी आहे.  नवी मुंबई मेट्रोची जबाबदारी महामेट्रोला सोपवण्यात आली आहे. 

मेट्रोकडून प्रवासी भाडेदेखील ठरवण्यात आले आहे. 

  • २ किमीसाठी १० रुपये,
  • २ ते ४ किलोमीटरसाठी १५ रुपये भाडे असेल. 
  • त्यानंतर प्रति 2 किलोमीटरसाठी ५ रुपये भाडे वाढवण्याचा प्रस्ताव आहे. 
  • १० किमीपासून पुढे ४० रुपये भाडे असेल. 
  • बेलापूर ते  पेंढरपर्यंतचे भाडे ४० रुपये असणार आहे. 

नवी मुंबई मेट्रो मार्गावरील स्टेशन 

बेलापूर ते पेंढर (तळोजाजवळ) पर्यंत 11 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी २ स्टॉप आहेत. या मार्गावर बेलापुर, सेक्टर-7 बेलापुर, सायन्स पार्क, उत्सव चौक, सेक्टर  ११ खारघर, सेक्टर १४ खारघर, सेंट्रल पार्क, पेथापाड़ा, सेक्टर ३४ खारघर, पंचनद और पेंढर टर्मिनल ही स्टेशन आहेत. 

IPL_Entry_Point