मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nashik Graduate Constituency : “जिंकलो तरी विजयोत्सव करणार नाही” सत्यजित तांबेंनी असं का म्हणाले?

Nashik Graduate Constituency : “जिंकलो तरी विजयोत्सव करणार नाही” सत्यजित तांबेंनी असं का म्हणाले?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 02, 2023 10:58 PM IST

Satyajit tambe : सत्यजीत तांबे यांनी जाहीर केले आहे की, नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मानस पगार यांचे निधन झाल्याने पदवीधर निवडणूक जिंकलो तरी विजयोत्सव साजरा करणार नाही.

सत्यजीत तांबे
सत्यजीत तांबे

MLC Election Result : राज्यात आज शिक्षक-पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची सकाळपासून मतमोजणी सुरू असून काही जागांचे निकाल लागले आहेत. नागपूरनंतर सर्वांची नजर ज्या मतदारसंघाकडे लागली आहे. त्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी अद्याप सुरू असून, तीन फेऱ्या संपल्यानंतरही सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. त्यांनी निर्णायक आघाडी घेतली असून त्यांच्या विजयांची औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. मात्र या पार्श्वभूमीवरच सत्यजित तांबे यांनी केलेल्या एका ट्वीटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विजयी झाल्यानंतरही विजयोत्सव साजरा न करण्याचे आवाहन सत्यजित तांबे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. या निर्णयामागचे कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सत्यजित तांबे यांनी ट्विट करत म्हटले आहे की,“विजयाच्या आपण अगदी जवळ आहोत, पण विजयोत्सव साजरा करणार नाही,माझा मित्र मानस पगार आज आपल्यातून गेलाय, त्यामुळे कोणताही आनंदोत्सव नाही. सर्व सहकाऱ्यांना विनंती आहे, कृपया संयम राखावा. मी ३ ते ७ फेब्रुवारीला संगमनेर येथे सर्वांना भेटणार आहे, त्यामुळे कोणतीही घाई करु नये,ही विनंती.

या अगोदर सत्यजित तांबे यांनी ट्वीटरवर मानस पगार याच्यासोबतचा फोटो शेअर करत,भावपूर्ण श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. “भावपूर्ण श्रद्धांजली,माझा खंबीर पाठीराखा सहकारी मित्र,नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष, मानस पगार याचे अपघाती निधन झाले. मन सुन्न करणारी ही बातमी आहे. निशब्द करणारी बातमी आहे.” असं सत्यजित तांबेंनी ट्वीट केलं आहे.

IPL_Entry_Point