मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai News : आजाराला कंटाळून नायर रुग्णालयात रुग्णानं उचललं टोकाचं पाऊल
 crime
crime (HT_PRINT)

Mumbai News : आजाराला कंटाळून नायर रुग्णालयात रुग्णानं उचललं टोकाचं पाऊल

29 March 2023, 8:08 ISTNinad Vijayrao Deshmukh

Mumbai News : नायर रुग्णालयात गेल्या दीड महिन्यापासून भरती असलेल्या एका रुग्णाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले

मुंबई : नायर रूग्णालयात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात गेल्या एक दीड महिन्यापासून दाखल असलेल्या रूग्णाने आजाराला कंटाळून रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अविनाश सावंत (४०) असे या रूग्णाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अविनाश सावंत यांना हृदयविकाराचा त्रास होता. या आजारवर उपचार घेण्यासाठी तो दीड महिन्यांपूर्वी नायर रुग्णालयात भरती झाला होता. दरम्यान, मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील बाथरूम कडे जात असताना त्यांनी गॅलरीतून उडी मारली.

यात तो गंभीर जखमी झाला. त्याने उडी मारल्याने रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने त्याला दाखल करून घेत उपचार केले. मात्र गंभीर जखमी झाल्याने उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. सावंत यांचे नातेवाईकही यावेळी रूग्णालयात होते. त्यामुळे आग्रीपाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

 

विभाग