Aarey Metro Car Shed : आरे कॉलनीतील मेट्रो-३ च्या कारशेडसाठी येथील झाडांवर पुन्हा कुऱ्हाड उगारली जाणार आहे. तब्बल १७७ झाडे तोडण्यास मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी परवानगी दिली आहे. पालिकेच्या या परवानगीला पर्यावरण प्रेमी यांनी आक्षेप घेतला असून या निर्णयाच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी पुन्हा एकदा थेट उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या बाबत शुक्रवारी सुनावणी होणार आहे.
आरे येथील वृक्षतोडीवरून या पूर्वही मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. महावीकस आघाडीच्या काळात हा प्रकल्प बंद करण्यात करण्यात आला होता. मात्र, शिंदे सरकारच्या काळात पुन्हा येथील कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हे काम सुरू करत असताना पुन्हा येथील झाडे तोडली जाणार नाही. आवश्यक सर्व ती झाडे तोडण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते.
मात्र, आता पुन्हा आरेतील मेट्रो- ३ साठी झाडे तोडली जाणार आहेत. येथील कामासाठी ८४ झाडे तोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. मात्र, महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे १७७ झाडे तोडण्याची परवानगी मागितली होती. त्याविरोधात याआधीही पर्यावरणप्रेमींनी हायकोर्टात धाव घेतली होती.
आता पुन्हा १७७ वृक्षतोडीच्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं पुन्हा पालिकेने परवानगी मागितली होती. याला मुंबई पालिकेच्या आयुक्तांनी परवानगी दिली आहे. या विरोधात आता पर्यावरण प्रेमी न्यायालयीन लढा देणार आहे. या संदर्भात ३१ मार्चला सुनावणी होणार आहे. यामुळे न्यायालय नेमका काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
संबंधित बातम्या