मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Nagpur : पाच जणांची हत्या करणाऱ्या विवेक पालटकरला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

Nagpur : पाच जणांची हत्या करणाऱ्या विवेक पालटकरला मरेपर्यंत फाशीची शिक्षा

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 15, 2023 03:14 PM IST

Nagpur : एका रात्रीत पाच जणांची हत्या करून त्यांचे आयुष्य संपविणाऱ्या विवेक गुलाबराव पालटकरला नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. न्यायाधीश आर. एस. पावसकर यांनी यांनी हा निर्णय दिला आहे.

Nagpur
Nagpur

नागपूर : पाच वर्षांपूर्वी एकाच कुटुंबातील तब्बल पाच जणांची हत्या करण्यात आल्याची घटना नागपूर येथे घडली होती. पवनकर असे हत्या करण्यात आलेल्या कुटुंबीयांचे नाव होते. या हत्याकांडप्रकरणातील आरोपी विवेक गुलाबराव पालटकर विरुद्ध गुन्हा सिद्ध झाला असून आज नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला मरेपर्यंत फाशीशी शिक्षा ठोठावली आहे. न्यायाधीश आर. एस. पावसकर यांनी यांनी हा निर्णय दिला आहे.

१० जून २०१८ रोजी रात्री ९.३० ते १० वाजतादरम्यान विवेक हा कमलाकर यांच्या घरी रात्रीच्या मुक्कामाने आला. सर्व जण झोपलेले असताना विवेकने रात्री तीनच्या सुमारास लोखंडी सब्बलने एकापाठोपाठ एक घरातील पाचही सदस्यांच्या डोक्यावर प्रहार करून त्यांची हत्या केली होती. कमलाकर मोतीराम पवनकर (वय ४८), त्यांच्या पत्नी अर्चना (वय ४५), आई मीराबाई (वय ७३), मुलगी वेदांती कमलाकर पवनकर (वय १२) व भाचा कृष्णा ऊर्फ गणेश विवेक पालटकर (वय ५) यांचा अशी मृतांची नावे होती. यातून विवेकची मुलगी वैष्णवी (वय ७) व मिताली कमलाकर पवनकर (वय ९) या दोघी बचावल्या होत्या. पोलिसांनी विवेकला अटक करत न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. तेव्हा पासून हा खटला सुरू होता.

यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान जिल्हा न्यायाधीश आर. एस. पावसकर यांच्यापुढे दोन्ही पक्षांनी फाशीवर युक्तिवाद केला होता. सरकारी पक्षाने हे प्रकरण दुर्मिळात दुर्मिळ असून विवेकला फाशीच का दिली जावी, हे पटवून देण्यासाठी युक्तिवाद केला. तसेच बचावपक्षाने, त्याला फाशी दिली जाऊ नये, हे पटवून देण्यासाठी युक्तिवाद केला.

यावेळी आरोपीला देखील त्याची इच्छा विचारण्यात आली. यावेळी मला ‘मला त्वरित संपवा, मला फाशी द्या, मला आता जगण्याची इच्छा नाही’ असे मत आरोपीने न्यायालयासमोर मांडले. आज न्यायाधीश आर. एस. पावसकर यांनी यांनी आरोपीला फाशी दिली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अभय जिकार यांनी कामकाज पाहिले. त्यांना ॲड. मोहम्मद अतिक यांनी सहकार्य केले.

IPL_Entry_Point

विभाग