Mumbai Rain: मुंबईत पाऊस धारा ! ठाणे, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवलीत रात्रीपासून हजेरी
Unseasonal Rain Update : मुंबईत अनेक ठिकाणी आज पहाटे पासून पावसाला सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी वीजांचा कडकडाटासह माध्यमस्वरूपाचा पाऊस सुरू आहे. ठाणे, पालघर, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवलीत रात्रीपासून पाऊस सुरू आहे. पावसामुळे मात्र, सकाळी ऑफिसला जणाऱ्यांची तारांबळ उडाली.
Maharashtra Mumbai Rain Updates: मुंबई आणि परिसरात काल रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. ठाणे, पालघर, वसई-विरार आणि कल्याण-डोंबिवलीत, नायगांव, भाईंदर, या ठिकाणी देखील रात्रीपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मात्र, चाकरमान्यांची गैरसोय झाली. पावसामुळे कामासाठी बाहेर पडतांना त्यांना धावपळ करावी लागली. असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून उकड्यापासून त्रस्त असलेल्या मुंबईकरांना मात्र पावसामुळे दिलासा मिळाला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
मुंबईसह उपनगरांमध्ये, ठाण्यात आणि कल्याण डोंबिवलीत आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईसह मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरात पाऊस सुरू आहे. अंधेरी परिसरात पावसाचा जोर जास्त आहे. तर जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली दहिसर या परिसरामध्ये देखील पावसाने हजेरी लावली आहे. हलका आणि माध्यम स्वरूपाचा हा पासून आहे. दिवा, डोंबिवली, नायगांव, भाईंदर, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर परिसरातही पावसाची रिप रिप सुरू आहे. सकाळी सुरू असलेल्या पावसामुळे कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची मात्र, त्रेधा उडाली. पावसामुळे त्यांना बाहेर पडणे कठीण झाले. ठाणे परिसरात वीजांच्या कडकडाटासह पावसाने तूफान हजेरी लावली आहे.
दरम्यान, राज्यात काही भागात देखील पावसाने तूफान हजेरी लावली. पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हात तोंडाशी आलेले पीक पावसाने खराब झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. त्यात संप असल्याने नुकसांनीचे पंचनामे देखील झालेले नाही. यामुळे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मुद्यावरून विरोधी पक्षाने देखील सरकारला धारेवर धरले आहे. सरकारने देखील मदत देण्यास संमती दर्शवली आहे.