मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Railway Mega block : मुंबईत रविवारी लोकलचा ब्लॉक; पनवेल-कुर्ला दरम्यान विशेष सेवा

Mumbai Railway Mega block : मुंबईत रविवारी लोकलचा ब्लॉक; पनवेल-कुर्ला दरम्यान विशेष सेवा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 10, 2023 08:22 PM IST

Mumbai Local Train Mega block News : नियमित देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मध्य रेल्वेनं रविवार, १२ मार्च रोजी मेगाब्लॉक घेतला आहे.

Mumbai Railway Mega block
Mumbai Railway Mega block

Mumbai Local Train Mega block News : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वेनं मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, १२ मार्च रोजी मेगाब्लॉक घेतला आहे. ब्लॉकच्या कालावधीत लोकल गाड्या बंद राहणार आहेत. त्यामुळं मुंबईकरांना गाड्यांच्या वेळा पाहूनच रविवारच्या कामाचं नियोजन करावं लागणार आहे.

ब्लॉकच्या वेळेत अशी असेल मध्य रेल्वेची वाहतूक

  • मध्य रेल्वेवरील माटुंगा ते मुलुंड दरम्यान सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असेल.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या जलद गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान स्लो ट्रॅकवर वळवण्यात येतील. ठाण्याच्या पुढं या गाड्या पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील व नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरानं पोहोचतील.
  • ठाण्याहून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेच्या दरम्यान सुटणाऱ्या गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान स्लो ट्रॅकवर वळवण्यात येतील. या गाड्या १५ मिनिटं उशिरानं नियोजित स्थळी पोहोचतील.

ब्लॉकच्या वेळेत अशी राहील हार्बर मार्गावरील वाहतूक

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.४० या काळात मेगाब्लॉक राहील.
  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत पनवेलच्या दिशेनं सुटणाऱ्या आणि वांद्रे/गोरेगावहून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ दरम्यान सुटणाऱ्या लोकल गाड्या बंद राहतील.
  • पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
  • ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा सुमारे २० मिनिटांच्या अंतरानं चालवल्या जातील.
  • हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी आहे.

Video: मॉर्निंग वॉकला गेलेल्या व्यक्तीला भरधाव कारची धडक, अर्धा किलोमीटर फरफटत नेले; पुण्यातील घटना

IPL_Entry_Point