मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Accident : मुंबईतील महालक्ष्मी मंदिराजवळ भीषण अपघात; भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं!

Mumbai Accident : मुंबईतील महालक्ष्मी मंदिराजवळ भीषण अपघात; भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 20, 2024 05:09 PM IST

Mumbai Mahalakshmi Road Accident: मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराजवळ भरधाव कारने दोन अल्पवयीन मुलींना उडवले.

मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराजवळ भरधाव कारने दोन अल्पवयीन मुलींना धडक दिली.
मुंबईच्या महालक्ष्मी मंदिराजवळ भरधाव कारने दोन अल्पवयीन मुलींना धडक दिली.

Mumbai Mahalakshmi Accident: मुंबईतील महालक्ष्मी मंदिराजवळ शनिवारी (१९ एप्रिल २०२४) भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना भरधाव कारने उडवल्याची धक्कादायक घटना घडली. दोन्ही जखमी मुलींना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, त्यांच्या प्रकृतीबाबात अद्याप समजू शकलेली नाही.

संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अल्पवयीन मुली रस्ता ओलांडताना दिसत आहेत. त्याच क्षणी एका भरधाव कारने त्यांना धडक दिली आणि दोन्ही मुली रस्त्यावर खाली पडण्यापूर्वी हवेत उंच फेकल्या गेल्या. यानंतर कार घटनास्थळवरून गायब होते. अपघातातील कार पिवळ्या रंगाची सेडान आहे. ऐशानी जाधव (वय, १४) आणि जान्हवी कनोजिया (वय, १४) अशी जखमी मुलींची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pimpri chinchwad: पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल

या अपघाताची दखल महाराष्ट्र बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या सुशीबेन शहा यांनी घेतली आहे. मुलींना झालेल्या दुखापतींची माहिती घेण्यासाठी ती शनिवारी संध्याकाळी नायर हॉस्पिटललाही भेट देणार आहे.

Mumbai Building Portion Collapses: मुंबईतील दुमजली इमारतीचा काही भाग कोसळला, ३ जण जखमी

बुलढाणा: हळदीच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

बुलढाणा जिल्ह्यात स्कॉर्पिओ कार पलटून झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. तर, ७ जण जखमी झाले आहेत. हळदी समारंभासाठी जाताना हा अपघात झाला. खामगाव- जालना मार्गावर हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यातील अंबाशी येथील देशमुख कुटुंबीय जालना येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी जात होते. मात्र, रस्त्यातच त्यांच्या कारला अपघात झाला. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

तीन जणांचा जगीच मृत्यू

प्राथमिक माहितीनुसार, देशमुख परिवारातील ८ सदस्य देऊळगाव राजा येथून हळदीच्या समारंभासाठी स्कॉर्पिओ वाहनाने जात होते. हा अपघात खामगाव जालना महामार्गावरील दगडवाडी गावाजवळ झाला. देऊळगावमही ते देऊळगावच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. यातील एकाची प्रकृती अत्यावस्थ असल्याने त्याला जालना येथे तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात जाण्याापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

 

IPL_Entry_Point

विभाग