मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime : कोरेगावभीमा येथे सहावीतील मुलीवर बलात्कार; गरोदर झाल्याने खळबळ

Pune Crime : कोरेगावभीमा येथे सहावीतील मुलीवर बलात्कार; गरोदर झाल्याने खळबळ

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 29, 2023 11:31 AM IST

Pune koregaon bhima minor rape : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सहावीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार करण्यात आला. यातून ती गरोदर राहिल्याने या घटनेचा उलगडा झाला. आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला.

Rape with minor
Rape with minor

पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कोरेगाव भीमा येथे सहावीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलगी ही गरोदर राहिली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात पोस्को आणि बालात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Unseasonal Rain : मराठवाड्यात अवकाळीचे थैमान; १० ठार तर ११७८ कोंबड्या दगावल्या; शेतमालाचे नुकसान

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार पीडित मुलगी ही कोरेगाव भीमा येथे राहण्यास आहे. ती येथील शाळेत सहावीत शिक्षण घेत आहे. काल तिच्या पोटात दुखत असल्याने तिच्या आईंने तिला दवाखण्यात नेले. यावेळी डॉक्टरांनी मुलगी गरोदर असल्याचे सांगितल्याने तिची आई हादरली. यावेळी तिच्या आईने आणि नातेवाइकांनी तिला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली. यावेळी तिने तिच्या सोबत घडलेला प्रसंग कथन केला.

पीडित मुलगी ही शाळेत जात असतांना तिच्या घराजवळ किराणा दुकानात गेली होती. ती दुकानातून परत येत असतांना तिच्या घराशेजारी राहणाऱ्या युवकाने तिला घरी बोलावले. तिला घरात घेत दरवाजा बंद करून तिच्यावर बलात्कार केला. यातून ती गर्भवती राहली. या बाबत कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील आरोपीने पीडितेला दिली. त्यामुळे तिने हा प्रकार घरच्यांपासून लपून ठेवला.

मात्र, ती गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या आईने शिक्रापूर पोलीस ठाण्यात जात या प्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी मुलगा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे करत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग