मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

Mar 15, 2023 06:55 PM IST

Deepak sawant to join shinde faction : माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतयांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दीपक सावंत उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते मानले जात होते. मात्र मागील काही दिवसांपासून ते नाराज असल्याच्या चर्चा होत्या.

माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
माजी आरोग्यमंत्री दीपक सावंतांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाई यांना ठाकरे गटाला सोडून मुख्यमंत्री शिंदे गटात सामील झाल्यानंतर ठाकरे गटाला आता आणखी एक धक्का बसला आहे. माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.  दीपक सावंत उद्धव ठाकरे यांच्या जवळचे नेते मानले जात होते. मात्र मागील काही दिवसांपासून ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. त्यांच्या पक्ष सोडण्याने ठाकरे गटाला मोठे भगदाड पडले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांच्या मुलाने शिंदे गटात प्रवेश केल्याने ठाकरे गटाला धक्का बसला होता. दीपक सावंत यांच्या निमित्ताने शिंदे गटाने पुन्हा एकदा ठाकरे गटाला धक्का दिला आहे. दीपक सावंत हे शिंदे गटाचं मुख्यालय असणाऱ्या बाळासाहेब भवनमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. 

दीपक सावंत ठाकरे गटावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली होती. याच नाराजीमुळे उद्धव ठाकरे आणि दीपक सावंत यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचं बोललं जात होतं. यामुळेच त्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचा अंदाज आहे. दरम्यान दीपक सावंत यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४