मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पवार साहेब मोठे नेते, पण लोकशाहीत…; एकनाथ शिंदे यांचं प्रत्युत्तर
मंत्री एकनाथ शिंदे
मंत्री एकनाथ शिंदे (फोटो - एएनआय)
24 June 2022, 11:41 ISTSuraj Sadashiv Yadav
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
24 June 2022, 11:41 IST
  • शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, "विधानसभेत जेव्हा बहुमत चाचणी होईल तेव्हा सरकार बहुमतात आहे हे दिसेल."

शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे सध्या गुवाहाटीतील हॉटेलमध्ये आहेत. गेल्या चार दिवसांपासून बंडाचा झेंडा हाती धरलेल्या एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे संख्याबळ दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातच शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यासह १२ आमदारांवर कारवाई करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गटाची भूमिका चुकीची आहे. अशी कोणतीही कारवाई करता येत नाही. आमच्या गटावर कारवाई करणं हे घटनाबाह्य आहे. बैठकीला उपस्थित राहिलो नाही म्हणून कारवाईचं हे देशातील पहिलंच उदाहरण आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आपल्याकडे संख्याबळ असल्याचं सांगत एकनाथ शिंदे म्हणाले की, आमच्याकडे संख्याबळ आहे. अर्थातच ते संख्याबळ सिद्ध करुन दाखवण्याची आमची ताकद आहे. कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या आहेत. आमच्याकडं संख्याबळ आहे. आज गटाची बैठक घेऊन निर्णय घेऊ.आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहे. शिवसेनेच्या चिन्हावर आम्ही दावा केला नाही.

"बाहेर गेलेले आमदार राज्यात परतल्यानंतर शिवसेनेसोबत असतील असा विश्वास वाटतोय. विधानसभेत ज्या वेळी बहुमत चाचणी होईल त्यावेळी समजेल हे सरकार बहुमतात आहे. अशी स्थिती मी महाराष्ट्रात याआधी अनेकदा पाहिली आहे. आताच्या परिस्थितीवर मात करुन हे सरकार कायम राहिल असा विश्वास आहे.

शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की, "विधानसभेत जेव्हा बहुमत चाचणी होईल तेव्हा सरकार बहुमतात आहे हे दिसेल." पवारांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "पवार साहेब मोठे नेते आहेत. लोकशाहीत नंबर महत्त्वाचे आहेत. यावर इतर काही सांगण्याची गरज नाही."

एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटीतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये आपल्यामागे एक राष्ट्रीय पक्ष, महाशक्ती असल्याचं ते म्हणतात. यातली महाशक्ती कोण असं विचारलं असता ते म्हणतात की, ती महाशक्ती बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची आहे. ही आम्हाला वेळोवेळी मदत करेल.