मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Hariharpeth Akola Voilence : अकोला शहरातील संचारबंदी शिथिल, दंगलग्रस्त भागात नवे नियम लागू

Hariharpeth Akola Voilence : अकोला शहरातील संचारबंदी शिथिल, दंगलग्रस्त भागात नवे नियम लागू

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 16, 2023 08:40 AM IST

Hariharpeth Akola Voilence : इन्स्टाग्रामवरील वादग्रस्त पोस्टरनंतर अकोला शहरात दोन गटात तुफान राडा झाला होता.

Hariharpeth Akola Voilence
Hariharpeth Akola Voilence (PTI)

Hariharpeth Akola Voilence : सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेयर करण्यात आल्यानंतर अकोला शहरातील हरिहरपेठ भागात दोन गटात तुफान राडा झाला होता. जमावाने एकमेकांवर दगडफेक करत शेकडो वाहनं जाळली होती. याशिवाय पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी अकोला शहरात जमावबंदी तसेच संचारबंदी लागू केली होती. हिंसाचाराच्या तीन दिवसानंतर परिस्थिती निवळली आहे. त्यानंतर आता पोलिसांनी अकोला शहरातील संचारबंदीच्या नियमांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हिंसाचारग्रस्त हरिहरपेठ भागामध्ये नवे नियम लागू केले आहे.

अकोल्यातील हरिहरपेठ परिसरात ठराविक काळासाठी संचारबंदीतील नियमांत शिथिलता आणण्यात आली आहे. हिंसाचारग्रस्त भागात सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत नियमात सूट देण्यात आली आहे. रात्री आठ वाजेनंतर जमावबंदी तसेच संचारबंदी लागू राहणार असल्याचं स्थानिक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. नागरिकांना दैनंदिन व्यवहारांसाठी सूट देण्यात आलेली असली तरी हरिहरपेठ परिसरातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी अद्याप पूर्ववत करण्यात आलेली नाही. शहरातील अनेक भागांमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. तसेच जिल्हाधिकारी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे अकोल्यातील स्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांमध्ये हिंसाचार होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि त्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्यातील शेवगावात दोन गटात जोरदार राडा झाला आहे. त्यामुळं आता राज्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यातील वातावरण खराब करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

IPL_Entry_Point