मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ulhasnagar Slab Collapse : उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ४ जणांचा मृत्यू
उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ४ जणांचा मृत्यू
उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ४ जणांचा मृत्यू

Ulhasnagar Slab Collapse : उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून ४ जणांचा मृत्यू

22 September 2022, 20:52 ISTShrikant Ashok Londhe

उल्हासनगर भागातील कॅम्प क्रमांक पाच परिसरात मानस टॉवर या इमारतीचा स्लॅब (Ulhasnagar slab collapse) कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे– ठाण्यातील उल्हासनगर भागातील कॅम्प क्रमांक पाच परिसरात मानस टॉवर या इमारतीचा स्लॅब (Ulhasnagar slab collapse) कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक जण जखमी झाला आहे. मानस टॉवर इमारतीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब कोसळला. इमारतीच्या पाचही मजल्यावर हा स्लॅब आदळून जमीनदोस्त झाला. आज (गुरुवार) दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.
 

ट्रेंडिंग न्यूज

इमारतीचा ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन दल आणि इतर यंत्रणांकडून मदत व बचाव कार्य सुरू आहे. ढोलनदास धनवाणी, सागर ओचानी, रेणू धनवाणी आणि प्रिया धनवाणी असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या लोकांची नावे आहे. तर एक व्यक्ती जखमी झाला आहे. त्याचे नाव समजू शकले नाही. त्याच्यावर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यापूर्वीही उल्हासनगरमध्ये अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग