मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  New Parliament: विरोधकांच्या बहिष्कारावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, मोदींचे नाव घेत दिला इशारा

New Parliament: विरोधकांच्या बहिष्कारावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, मोदींचे नाव घेत दिला इशारा

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 24, 2023 05:03 PM IST

Eknath Shinde: संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावरुन देशात सुरु असलेल्या वादावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Eknath Shinde
Eknath Shinde

Eknath Shinde on New Parliament Building: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २८ मे २०२३ रोजी देशाच्या नव्या संसदेचे उद्घाटन केले जाणार आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या संसद भवनाचं उद्घाटन करणार असल्याने १९ विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. या सगळ्या पक्षांनी या सोहळ्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. याच पाश्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

नव्या संसदेच्या उद्घाटनावरुन सुरु असलेल्या वादावर एकनाथ शिंदे म्हणाले की, देशाची प्रगती जगासमोर आहे. संपूर्ण जग भारताचा आदर करीत आहे. जेवढा विकास ७० वर्षांत झाला नाही, तेवढा विकास गेल्या ८-९ वर्षांत झाला. जनतेला सर्व काही माहिती आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सर्व विक्रम मोडीत निघणार, असाही एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे.

नव्या संसद भवनाचं उद्घाटन ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. देशात लोकशाही धोक्यात आहे, तरीही आम्ही या नव्या संसद भवन निर्मितीबाबत काही बोललो नाही. आपल्या देशासाठी हा महत्त्वाचा क्षण आहे. मात्र, या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाच निमंत्रण देण्यात आलं नाही. मोदींच्या हस्ते नव्या संसदेचं उद्घाटन होणार आहे. ही बाब म्हणजे आपल्या देशाच्या लोकशाहीवर थेट हल्ला आहे. आम्ही त्यामुळेच या कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे, अशी विरोधी पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केले होते. या ट्विटमध्ये त्यांनी असे म्हटले होते की, नव्या संसद भवनाचे उद्घाटन देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात यावे. यानंतर हा वाद आणखी पेटला.

IPL_Entry_Point

विभाग