Chhatrapati Sambhaji Nagar: संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची पहिल्यांदाच संयुक्त सभा होत आहे. या सभेसाठी छत्रपती संभाजी नगरातच्या वाहतुकीत फेरबदल करण्यात आले आहे. दुपारनंतर शहरातील तीन मोठे रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहे. यामुळे नागरिकांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सभेला येणाऱ्यांसाठी कर्णपुरा मैदानावर असेल पार्किंची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मिल कॉर्नर ते खडकेश्वर, खडकेश्वर ते भडकल गेट आणि भडकल गेट ते पोस्ट ऑफिस असे तीन रस्ते बंद राहणार आहेत. याशिवाय, सिल्लोड फुलंब्री वरून येणाऱ्यांसाठी हर्सूल सावंगी रस्त्यावर मनाई करण्यात आली आहे. सिल्लोड फुलंब्री वरून येणाऱ्यांना केम्ब्रिज चौक जालना रोड मार्गे कर्णपुरा मैदानावर येणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांच्यासह आघाडीचे अनेक नेते संबोधित करणार आहेत. संभाजीनगरात नुकताच झालेला राडा आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षाचे नेते काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
भाजपनेही वीर सावरकर यात्रेचे आयोजन रविवारी सायंकाळी पाच वाजताच केले आहे. तुमची सभा तर आमची यात्रा असा डाव आणि प्रतिडाव रविवारी रंगणार आहे. हे दोन्ही राजकीय कार्यक्रम दंगलीनंतर होत असल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
संबंधित बातम्या