मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mohan Bhagwat On LGBTQ : मोहन भागवतांचं एलजीबीटी समुदायावर मोठं वक्तव्य, म्हणाले...

Mohan Bhagwat On LGBTQ : मोहन भागवतांचं एलजीबीटी समुदायावर मोठं वक्तव्य, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jan 11, 2023 10:17 AM IST

Mohan Bhagwat On LGBTQ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहिल्यांदाच एलजीबीटीक्यू समुदायावर रोखठोकपणे भाष्य केलं आहे.

Mohan Bhagwat On LGBTQ Community
Mohan Bhagwat On LGBTQ Community (HT)

Mohan Bhagwat On LGBTQ Community : भारतासह जगभरातील एलजीबीटीक्यू समुदायाच्या हक्क आणि अधिकारांवर चर्चा होत असते. काही वर्षांपूर्वी अमेरिकेत तृतीयपंथींना सर्व कायदेशीर अधिकार देण्याचा निर्णय तेथील कोर्टानं घेतल्यानंतर भारतातही तृतीयपंथीयांबाबतच्या एका खटल्यात सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निकाल दिला होता. त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी एलजीबीक्यू समुदायाबाबत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. संघाचं मुखपत्र असलेल्या पांचजन्य दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मोहन भागवतांनी तृतीयपंथीयांच्या अधिकारांबाबत वक्तव्य केलं आहे.

मुलाखतीत बोलताना मोहन भागवत म्हणाले की, एलजीबीटी समुदायाच्या खाजगी गोष्टींना समजून त्यांना समाजात मान द्यायला हवा. मानवाचं आस्तित्व आहे तेव्हापासून अशा प्रकारची लोक समाजात आहे. त्यामुळं त्यांच्या तृतीयपंथीयांच्या अधिकारांवर आवाज उठवण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही भागवत म्हणाले. प्रत्येकाला जीवन जगण्याचा अधिकार असल्यानं तृतीयपंथीयांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळायला हवेत, कारण तेही आपल्या समाजाचे भाग असल्याचं सांगत भागवतांनी एलजीबीटीक्यू समाजाच्या अधिकारांचं समर्थन केलं आहे.

एलजीबीटीक्यू किंवा ट्रान्सजेंडर ही काही समस्या नाही. तो समाजातला एक पंथ आहे. त्यांचेही देवी-देवता आहेत. काही तृतीयपंथीयांचे महामंडलेश्वरदेखील आहे. त्यामुळं त्याचा हिंदू संस्कृती आणि परंपरेत यापूर्वीच विचार झालेला असल्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार यापेक्षा वेगळा काही नाही, असंही सरसंघचालक मोहन भागवत म्हणालेत.

IPL_Entry_Point