मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  krishna hegde : उद्धव ठाकरे यांना धक्का! मुंबईतील माजी आमदार शिंदे गटात

krishna hegde : उद्धव ठाकरे यांना धक्का! मुंबईतील माजी आमदार शिंदे गटात

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Nov 29, 2022 11:18 AM IST

Former MLA krishna hegde Joins Eknath Shinde faction: उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कमळाची साथ सोडून शिवसेनेत आलेल्या एकमेव माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले आहेत.

भाजपमधून आलेया कृष्णा हेगडे यांनी मशाल सोडून हाती धरली ढाल तलवार
भाजपमधून आलेया कृष्णा हेगडे यांनी मशाल सोडून हाती धरली ढाल तलवार

मुंबई : भाजपची साथ सोडून शिवसेनेत आलेल्या एकमेव माजी आमदाराने उद्धव ठाकरे गटाला राम राम केला आहे. माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी त्यांच्या समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. हेगडे यांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेत त्यांचा गटात प्रवेश केला. यावेळी त्यांची बाळसाहेबांची शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली.

भाजपमधून बाहेर पडत कृष्णा हेगडे यांनी ५ फेब्रुवारी २०२१ रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांचा प्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात होता. मात्र, येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हेगडे यांनी ठाकरे यांची साथ सोडल्याने त्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

विले पार्ले हा कृष्णा हेगडे यांचा गड मानला जातो. काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचे ते कट्टर समर्थक होते. त्यावेळी ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. मात्र, शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या संजय निरुपम यांच्याशी मतभेद झाले. यामुळे त्यांनी कॉँग्रेस हात सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हेगडे यांचा भाजप प्रवेश झाला होता मात्र, काही दिवसानंतर हेगडेंनी भाजपमधून बाहेर पडत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी बाळासाहेबांची शिवसेना सचिव संजय मोरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ,बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे हेदेखील उपस्थित होते.

 

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग