मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune IT Raid : मोठी बातमी! पुण्यात बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाचे छापे

Pune IT Raid : मोठी बातमी! पुण्यात बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्तीकर विभागाचे छापे

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
May 04, 2023 02:32 PM IST

Pune IT Raid : पुण्यात आज सकाळ पासून प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायीकांवर कारवाई केली आहे.

income tax HT
income tax HT

पुणे : पुण्यातील तीन बड्या बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्ती कर विभागाने गुरुवारी सकाळी छापे घातले. प्राप्ती कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकांचे कार्यालय आणि निवासस्थानी जाऊन कारवाई केली. तब्बल ४० अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचे समजते. या कारवाईत काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. पाषाण रस्त्यावरील सिंध सोसायटी आणि पिंपरी चिंचवड येथे ही कारवाई करण्यात आली.

Pune sex racket : पुण्यात मसाज पार्लरमध्ये सुरू होता वेश्याव्यवसाय, सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा; ६ तरुणी ताब्यात

राज्यात सध्या राजकीय गोंधळ सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरांवर छापे टाकले.

पुण्यातील आयटीने सिंध सोसायटी आणि शहरातील पिंपरी चिंचवड परिसरात तसेच पुणे शहरातील इतर भागात छापे टाकल्याची माहिती आहे. या संदर्भात मात्र आयकर विभागाकडून याबाबत दुजोरा देण्यात आला नाही.

Cyclone Mocha : 'मोचा' चक्रीवादळ धडकणार! बंगाल, ओडिशाला हवामान विभागाचा हायअलर्ट

आयकर विभागातील सूत्रांनी सांगितले की, या कंपन्यांचे आर्थिक व्यवहार आणि कर चुकवेगिरीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांची अनेक कागदपत्रे आणि फाइल्सची छाननी सुरू आहे. प्राप्तिकर विभागाचे सुमारे चार ते पाच पथके पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करत असल्याचे देखजिल त्यांनी सांगितले.

IPL_Entry_Point

विभाग