मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Malegaon Crime News : नवरा-बायकोच्या भांडणात मेव्हण्यावर गोळीबार; मालेगावात तणाव, आरोपींची धरपकड

Malegaon Crime News : नवरा-बायकोच्या भांडणात मेव्हण्यावर गोळीबार; मालेगावात तणाव, आरोपींची धरपकड

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 28, 2022 02:25 PM IST

Husband Wife Disput : नवरा आणि बायकोमध्ये सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका नातलगावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

malegaon crime news marathi
malegaon crime news marathi (HT)

malegaon crime news marathi : नवरा आणि बायकोचं भांडण सुरू असताना मध्यस्ती करायला गेलेल्या मेव्हण्यावरच कटरनं जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगावात घडली आहे. याशिवाय या घटनेनंतर लोकांनी गर्दी केल्यानं आरोपींनी जमावाला पांगवण्याची हवेत गोळीबार केला. त्यामुळं मालेगाव शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव शहरातील निहालनगर भागात नवरा आणि बायकोचं भांडण सुरू होतं. त्यांच्यात शिवीगाळ होत असल्याचं पाहून मेव्हण्यानं मध्यस्थी करायचा प्रयत्न केला. परंतु त्यामुळं संतापलेल्या आरोपी पतीनं थेट मेव्हण्यावरच कटरनं हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शहरात एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळं लोकांनी नेमकं काय झालं, हे पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली. त्यामुळं संतापलेल्या आरोपीनं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं हवेत गोळीबार केला. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी घटनेची चौकशी केली असून आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शहरात खरंच गोळीबार झालाय का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेजची तपासणी करायला सुरुवात केली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून लवकरात लवकरात आरोपींना अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

IPL_Entry_Point

विभाग