मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sangli News : सांभाळ करता येत नसल्याच्या नैराशेतून बापाने मुलीला विहिरीत ढकलले!

Sangli News : सांभाळ करता येत नसल्याच्या नैराशेतून बापाने मुलीला विहिरीत ढकलले!

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 16, 2023 02:18 PM IST

Sangli News : मुलगी जन्मजात दिव्यांग असल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, ती बरी होत नसल्याने आणि तिचा सांभाळ करणे कठीण झाल्याने बापाने चार वर्षांच्या चिमूकलीला विहिरीत फेकून तिची हत्या केल्याची धक्कादाय घटना सांगली जिल्ह्यात घडली.

 crime news
crime news

सांगली : चार वर्षांच्या दिव्यांग मुलीचा सांभाळ करता येत नसल्याने मुलीला विहिरीत फेकून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुरळपमध्ये घडली. या प्रकरणी मुलीच्या बापाला अटक करण्यात आली आहे.

अण्णापा कोळी असे या निर्दयी बापाचे नाव आहे. तर श्रीदेवी कोळी असे हत्या करण्यात आलेल्या दिव्यांग मुलीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीदेवी ही दिव्यांग होती. तिच्यावर कोळी कुटुंबीयांकडून औषध उपचार करण्यात येत होते. मात्र, ती बरी होत नव्हती. तसेच तिचा सांभाळ करणे देखील कोळी कुटुंबाला शक्य होत नव्हते. यामुळे श्रीदेवीच्या वडिलांना नैराश्य आले होते.

अण्णाप्पा कोळी काही दिवसांपूर्वी दारू पिऊन घरी आला. यावेळी दारूच्या नशेत घराजवळ असणाऱ्या विहीरीत त्याने झोपली असलेल्या श्रीदेवी या आपल्या चार वर्षाच्या दिव्यांग मुलीला फेकून दिले. पाण्यात बुडल्याने तिचा मृत्यू झाला. दरम्यान, मुलगी बेपत्ता असल्याचा बनाव त्याने रचला. कोळी कुटुंबाने शोध सुरु केला असता घरा जवळ असलेल्या विहिरीमध्ये श्रीदेवीचा मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिसांनी अण्णाप्पा कोळीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या मुलीला विहिरीत फेकून दिल्याची कबुली दिली. त्याला कुरळप पोलिसांनी अटक केली आहे.

 

IPL_Entry_Point

विभाग