मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Tulaja Bhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी नवे नियम, त्रंबकेश्वरच्या घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय

Tulaja Bhavani Mandir : तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी नवे नियम, त्रंबकेश्वरच्या घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय

Atik Sikandar Shaikh HT Marathi
May 18, 2023 03:27 PM IST

Tulaja Bhavani Mandir News : त्रंबकेश्वर मंदिरासमोर घडलेल्या घटनेनंतर आता तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी नवे नियम लागू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Tulaja Bhavani Mandir News
Tulaja Bhavani Mandir News (HT)

Tulaja Bhavani Mandir News : नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दोन गटात राडा झाल्यानंतर आता तुळजाभवानी मंदिरात भाविकांसाठी नवे नियम लागू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तुळजा भवानी देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना आता तोकडे अथवा असभ्य कपड्यांमध्ये प्रवेश देण्यास मंदिर प्रशासनाने मज्जाव केला आहे. याशिवाय असभ्य कपडे घालून मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाविकांवर कारवाई करण्यात येणार आहे. नव्या नियमांचे फलक तुळजाभवानी मंदिर परिसरात लावण्यात आले आहे.

तुळजाभवानी मंदिरात असभ्य आणि अशोभनीय कपडे घालून येणाऱ्या भविकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही, असे फलक परिसरात लावण्यात आले आहे. तसेच भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे भान ठेवण्याचं आवाहनही मंदिर प्रशासनाने फलकांद्वारे भाविकांना केलं आहे. बर्मुडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक वस्त्र आणि तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. महिला आणि पुरुषांनी कशा प्रकारचे कपडे घालावेत, याबाबतची नियमावली मंदिर प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे. त्यामुळं आता त्रंबकेश्वर मंदिरातील वाद संपत असतानाच आता तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने घेतलेल्या नव्या निर्णायावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.

धाराशीवचे जिल्हाधिकारी आणि मंदिर प्रशासनातील अधिकारी यांच्यात बैठक पार पडली होती. त्यानंतर भाविकांसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहे. याशिवाय मंदिर परिसरातील सुरक्षारक्षकांची संख्या वाढवण्यात आली असून भाविकांचा ड्रेसकोड पाहूनच त्यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार असल्याचं फलकाच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर दोन गटात राडा झाला होता, त्यानंतर आता तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने भाविकांसाठी नवे नियम लागू केले आहे.

IPL_Entry_Point