मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Dasara Melava: दसरा मेळाव्याबाबत मोठा ट्विस्ट; शिंदे गट शिवाजी पार्कसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार!

Dasara Melava: दसरा मेळाव्याबाबत मोठा ट्विस्ट; शिंदे गट शिवाजी पार्कसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार!

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Sep 23, 2022 07:11 PM IST

शिवतीर्थ मैदान ठाकरे गटाला देण्याच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट ( Eknathshindegroup) सुप्रीम कोर्टाचा (supremecourt) दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.उद्यापर्यंतसुप्रीम कोर्टातयाचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

शिंदे गट शिवाजी पार्कसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार!
शिंदे गट शिवाजी पार्कसाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार!

Shivsena Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी यंदा प्रथमच शिवसेनेतील दोन गट आमने-सामने होते. त्यामुळे शिवाजी पार्कवर यंदा नेमका कुणाचा दसरा मेळावा होणार यावरुन तर्क-वितर्क लढवले जात होते. दरम्यान या सर्व चर्चांना मुंबई उच्च न्यायालयाने पूर्णविराम देत शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे गटाला मेळावा घेण्याची परवानगी दिली. मात्र हे प्रकरण येथेच संपले नसून यात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. मैदान ठाकरे गटाला देण्याच्या निर्णयाविरुद्ध शिंदे गट ( Eknath shinde group) सुप्रीम कोर्टाचा (supreme court) दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.उद्यापर्यंत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.

उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्या घेण्याची परवनागी दिली असून, आता उद्धव ठाकरेंचीच तोफ शिवतीर्थावर धडाडणारअसल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये जल्लोषाचे वातावरणआहे. सोशल मीडियावर याची निमंत्रणे दिली जाऊ लागली आहेत. या परिस्थितीत शिंदे गटाने आता दसरा मेळाव्यासाठी व शिवाजी पार्कसाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यामध्ये ठाकरे गट, शिंदे गट आणि पालिकेच्या वतीने युक्तीवाद करण्यात आले. सर्व पक्षांच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने ठाकरे गटाला दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर परवानगी दिली. यावेळी उच्च न्यायालयाने सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका फेटाळली. यानंतर शिंदे गट आता मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आता शिंदे गट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे बोलले जात आहे. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेता यावा, यासाठी शिंदे गट सर्वोच्च न्यायालायात जाणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत शिवसेना नेते अनिल परब यांना विचारले असता, आम्ही हे सर्वोच्च न्यायालयात पाहू, तिथेही लढू, अशी प्रतिक्रिया परब यांनी दिली आहे.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या