मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Hasan Mushrif : हसन मुश्रीफ पुन्हा ईडीच्या रडावर; दोन महिन्यात तिसऱ्यांदा धाड

Hasan Mushrif : हसन मुश्रीफ पुन्हा ईडीच्या रडावर; दोन महिन्यात तिसऱ्यांदा धाड

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 11, 2023 10:43 AM IST

ED raid on Hasan Mushrif house : राष्ट्रवादी काँग्रेसचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ सध्या ईडीच्या रडारवर असून ईडीची पथकाने पुन्हा त्यांच्या घरावर धाड टाकली आहे. ईडीच्या चार ते पाच अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी तपासणी करत आहे.

ED and IT Raid On Hasan Mushrifs Home
ED and IT Raid On Hasan Mushrifs Home (HT)

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणी या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. ईडीची वक्रदृष्टी सध्या हसन मुश्रीफ यांच्यावर आहे. आज पुन्हा ईडीच्या पथकाने त्यांच्या घरावर धाड टाकली आहे. दोन महिन्यातील ही तिसरी कारवाई आहे. ईडीचे चार ते पाच वरिष्ठ अधिकारी ही त्यांच्या घरी चौकशी करत आहेत. तब्बल पाच गाड्यांमधून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी दाखल झाले. दरम्यान, हसन मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना शेअर्स प्रकरण, आप्पासाहेब पाटील साखर कारखाना ब्रिक्स कंपनीनं चालवायला घेतला होता. याप्रकरणी किरीट सोमय्यांनी आरोप केला होता.या प्रकरणात मुश्रीफ यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, ईडीने या आधी सुद्धा त्यांचावर कारवाई केली होती. आता आज पुन्हा कारवाई करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

या धाडी बद्दल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ही कारवाई चुकीची आहे. सर्व यंत्रणा या तक्रारदारांना सामील झाल्या आहेत. ईडीने आधी कारवाई केली असतांना देखील पुन्हा जाणं हे चुकीचे आहे.

IPL_Entry_Point

विभाग