मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Earthquake in Palghar : पालघरमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Earthquake in Palghar : पालघरमध्ये पहाटे भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 23, 2022 08:47 AM IST

Earthquake in Dahanu Talasari : पहाटे चार वाजेच्या सुमारास पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळं जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Earthquake in Dahanu Talasari Palghar
Earthquake in Dahanu Talasari Palghar (HT)

Earthquake in Dahanu Talasari Palghar : राज्यातील पालघर जिल्ह्यात आज पहाटे चार वाजेच्या सुमारास भूकंप झाल्याची माहिती समोर येत आहे. भूकंपाच्या धक्क्यांनी संपूर्ण पालघर जिल्हा हादरला असून या घटनेमुळं जिल्ह्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. जिल्ह्यातील डहाणू तलासरी तालुक्यात ३.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनं दिली आहे. या भूकंपात कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती अजून समोर आलेली नाही.

आज पहाटे चार वाजेच्या सुमारास पालघर जिल्ह्यातील उर्से, धुंदलवाडी, घोलवड, तलासरी बोर्डी, डहाणू, कासा, आंबोली आणि धानिवरीत ३.६ रिश्टर स्केल इतक्या तिव्रतेचा भूकंप झाला. गेल्या तीन वर्षांपासून डहाणू-तलासरी तालुक्यात लहान-मोठे भूकंपाचे धक्के अनेकदा जाणवले आहेत. परंतु आता आज सकाळी झालेला आतापर्यंतचा सर्वात जास्त तिव्रतेचा भूकंप असल्याचं बोललं जात आहे. या भूकंपामुळं जिल्ह्यातील अनेक घरांना तडे गेले असून घरांचं नुकसान झालं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच पालघरच्या डहाणूमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता पुन्हा भूकंप झाल्यानं प्रशासनानं तात्काळ मदत व बचावकार्य सुरू केलं आहे. पुन्हा मोठ्या तिव्रतेचा भूकंप होण्याची भीती लोकांना असल्यानं अनेक लोक घराबाहेर फिरत आहे. याशिवाय पहाटे झालेल्या भूकंपात जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये घरांचं मोठं नुकसान झालं आहे.

IPL_Entry_Point

विभाग