मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thank you… फडणवीसांनी मानले अपक्षांचे आभार

Thank you… फडणवीसांनी मानले अपक्षांचे आभार

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Jun 11, 2022 06:08 AM IST

सत्ताधारी महाविकास आघाडीसोबत असतानाही आम्हाला मतदान केल्याबद्दल राज्यातील छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचे आभार देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर आभार मानले.

Leader of Opposition in Maharashtra Assembly Devendra Fadnavis
Leader of Opposition in Maharashtra Assembly Devendra Fadnavis (Deepak Salvi )

सत्ताधारी महाविकास आघाडीसोबत असतानाही राज्यसभा निवडणुकीत मात्र भाजपला मतदान केल्याबद्दल राज्यातील छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर आभार मानले. (Devendra Phadnavis thanks independent MLA's) भाजपचे तिसरे उमेदवार धनंजय महाडीक यांना शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मते मिळाली, असा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला.

राज्यसभेच्या निवडणुकीचे मतदान रखडल्याने महाविकास आघाडी आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते विधानभवनात रात्रभर ठाण मांडून बसले होते. महाविकास आघाडीच्या पहिल्या पसंतीचे तीन उमेदवार आणि भाजपच्या दोन उमेदवारांच्या निवडीची घोषणा सर्वप्रथम करण्यात आली. त्यानंतर सर्वांना प्रतीक्षा होती ती सहाव्या उमेदवाराच्या निकालाची. सहाव्या जागेवर भाजपचे धनंजय महाडीक निवडून आल्याचे पहाटे ४ वाजता जाहीर करण्यात आले. त्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर येऊन देवेंद्र फडणवीस यांनी विजयीमुद्रेत धनंजय महाडीक यांना जोरदार मिठी मारली.

यावेळी फडणवीस यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोघे जण आजारी असतानाही मतदानाला आले, त्याबद्दल दोघांचेही आभार मानले. विजयाची ही मालिका यापुढेही अशीच सुरूच राहिल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

नवाब मलिक आले असते तरी पराभव झाला असता

या निवडणुकीत मतपत्रिकेची घडी न केल्यामुळे शिवसेना आमदार सुहास कांदे यांचं मत ग्राह्य धरण्यात आलं नाही. परंतु कांदे यांचं मत ग्राह्य धरलं असतं आणि कारागृहात असलेले नवाब मलिक यांना मत देण्याची परवानगी मिळाली असती तरीसुद्धा भाजप उमेदवारच जिंकला असता, असं फडणवीस म्हणाले.

२०१९चा कौल भाजपला; पण शिवसेनेने पाठित छुरा घोपसला

फडणवीस म्हणाले की २०१९ साली विधानसभा निवडणुकीचा कौल हा भाजपला मिळाला होता. परंतु शिवसेनेने पाठित खंजिर खुपसण्याचे काम केले. आता हे सरकार किती अंतर्विरोध भरलेलं आहे, हे आजच्या निकालातून दिसतं. राज्यसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला मतदान केल्याबद्दल फडणवीस यांनी राज्यातील छोटे पक्ष तसेच अपक्ष आमदारांचे आभार मानले.

IPL_Entry_Point