मराठी बातम्या  /  Maharashtra  /  Devendra Fadnavis On Group Farming Yojna

Devendra Fadnavis : गट शेतीबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान, म्हणाले त्यासाठी नवीन योजना आणणार

देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस
Shrikant Ashok Londhe • HT Marathi
Mar 12, 2023 04:52 PM IST

Devendra fadnavis on group farming : भविष्यात गटशेतीशिवाय पर्याय नसल्याचे देवेंद्रफडणवीस म्हणाले. गट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरु करणारअसल्याचेहीफडणवीस म्हणाले.

गट शेतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरणाचा वापर, आधुनिक शेती पद्धतीचा वापर करण्याची क्षमता तयार होते. त्यामुळे भविष्यात गट शेतीशिवाय पर्याय नसल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. गट शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन योजना सुरु करणारअसल्याचेही फडणवीस म्हणाले. पानी फाऊंडेशनचा फार्मर कप स्पर्धा २०२२ चा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात पार पडला. या कार्यक्रमात फडणवीसांनी पानी फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.

ट्रेंडिंग न्यूज

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या शेतीत रासायनिक खतांचा व कीटकनाशकाचा बेसुमार वापर होत असल्यानं आपल्या काळ्या आईची शक्ती जवळपास संपल्यात जमा आहे. यासाठी आता विषमुक्त व शाश्वत शेती काळाची गरज झाली आहे. गेल्या तीन वर्षात शेतकऱ्यांवर अनेक संकटं आली आहेत. यासाठी शेतीत बदल आवश्यक झाला आहे. दुसरीकडे रासायनिक अन्न खाल्ल्याने कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. प्रत्येक चार ते पाच घरानंतर कॅन्सरचे रुग्ण आढळत आहेत. हे टाळायचं असेल तर नैसर्गिक शेतीच आपल्याला करावी लागेल, असे फडणवीस म्हणाले.

 

फडणवीस म्हणाले की, नापीक असलेली जमीन आम्हाला द्या. त्याचा आम्ही शेतकऱ्यांना सलग ३० वर्षे मोबदला देऊ. त्यानंतर ती शेती शेतकऱ्यांना परत देऊ, असेही फडणवीस म्हणाले.

WhatsApp channel