मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Deepak Kesarkar : अजित पवार कधी मुख्यमंत्री होणार?, दीपक केसरकर म्हणाले...

Deepak Kesarkar : अजित पवार कधी मुख्यमंत्री होणार?, दीपक केसरकर म्हणाले...

Nov 05, 2023 10:38 PM IST

Deepak Kesarkar latest comment on next cm : राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळं शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Deepak Kesarkar On Ajit Pawar
Deepak Kesarkar On Ajit Pawar (HT)

Deepak Kesarkar On Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह काही आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. तेव्हापासून अजित पवार हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळं शिंदे गटात मोठी अस्वस्थता निर्माण झालेली आहे. अशातच आता अजित पवारांच्या आई आशा पवार यांनी देखील अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा असल्याचं बोलून दाखवलं आहे. त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकारमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. आशा पवार यांची प्रतिक्रिया देताच तातडीने शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकरांनी त्यावर सूचक वक्तव्य केलं आहे.

माध्यमांशी बोलताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, सध्या उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वय लहान आहे. त्यामुळं त्यांना आगामी काळात मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची संधी मिळू शकते. पुढील काळात होणाऱ्या सर्व निवडणुका या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच लढवल्या जाणार असल्याचं म्हणत दीपक केसरकर यांनी नव्या चर्चांना तोंड फोडलं आहे. राष्ट्रवादीचे नेते, मंत्री आणि कार्यकर्त्यांकडून अजित पवार लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करण्यात येत असतो. त्यातच आता अजित पवारांच्या आई आशा पवारांनी देखील मुलाला मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राष्ट्रवादीतील एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. कारण अजित दादा गटाचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी बारामती, मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले होते. त्यातच आता आशा पवारांनी देखील अशीच इच्छा व्यक्त केल्याने शिंदे गटाची राजकीय कोंडी होण्याची शक्यता आहे.

WhatsApp channel