मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ST Bus Strike : दिवाळीच्या तोंडावर एसटी बंदची हाक, कर्मचारी जाणार संपावर, कारण काय?

ST Bus Strike : दिवाळीच्या तोंडावर एसटी बंदची हाक, कर्मचारी जाणार संपावर, कारण काय?

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 05, 2023 06:40 PM IST

ST Bus Strike : एसटी महामंडळाचं शासनात विलीनिकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

ST Bus Strike In Maharashtra
ST Bus Strike In Maharashtra (HT)

ST Bus Strike In Maharashtra : एसटी महामंडळाचं शासनात विलीनिकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी बसचे कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्यापासून म्हणजेच सहा नोव्हेंबर पासून एसटी बस बंदची हाक देण्याता आली आहे. त्यामुळं आता शिंदे-फडणवीस सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन केलं जाणार असल्याची नोटीस जनसंघाच्या अध्यक्ष जयश्री पाटील यांनी एसटी महामंडळला दिली आहे. त्यामुळं आता दिवाळीला एसटीने घरी जाणाऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीचं सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. अनेक महिने संप सुरू असताना देखील सरकारने कर्मचाऱ्यांची विलिनिकरणाची मागणी मान्य केलेली नव्हती. परंतु आता पुन्हा एकदा दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कामगार संपावर जाणार आहे. एसटीचं शासनात विलिनिकरण, सातवा वेतन आयोग लागू करणे, शिस्त आवेदन पद्धती आणि अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचारी विविध शहरांमध्ये काम बंद ठेवून आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असतानाच आता आणकी एका आंदोलनाने जोर धरल्याने शिंदे-फडणवीस सरकारचं टेन्शन वाढलं आहे.

दक्षिणेतील तेलंगणा या राज्यात एसटी खात्याचं शासनात विलिनिकरण करण्यात आलेलं आहे. तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातील एसटी महामंडळाचं शासनात विलिनिकरण करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही ४२ टक्क्यांचा महागाई भत्ता देण्यात यावा, तसेच कामाचे तास कमी करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी शासनाचा निषेध करत आंदोलन करणार आहे. त्यामुळं आता दिवाळीसह अन्य काही सण काही दिवसांवर येवून ठेपलेले असताना सामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

IPL_Entry_Point