मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  VIDEO : जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी, NCP कडून मनपा अधिकाऱ्याला मारहाण

VIDEO : जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी, NCP कडून मनपा अधिकाऱ्याला मारहाण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 15, 2023 10:45 PM IST

Death threat to Jitendra awads family : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड व कुटूंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये सुभाषसिंह ठाकूर उर्फ बाबाजी यांना सुपारी दिल्याचे संभाषण असलेली क्लिप व्हायरल झाली आहे. त्यानंतर या क्लिपमधील आवाज असलेल्या मनपा अधिकाऱ्याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.

NCP कडून मनपा अधिकाऱ्याला मारहाण
NCP कडून मनपा अधिकाऱ्याला मारहाण

मुंब्र्याचे आमदारवराष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेजितेंद्र आव्हाड यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याबाबत संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. या क्लिपमध्ये बोलणारी व्यक्ती जितेंद्र आव्हाड,त्यांची मुलगी आणि जावयाला मारण्याचा कट आखत असल्याचे स्वतः आव्हाड यांनी सांगितले आहे. डॉ. जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला धडा शिकवण्यासाठी दिल्लीतील तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याला सुपारी दिल्याची कबुली देणारी ठाणे मनपातील अधिकारी महेश आहेर यांची ऑडिओ क्लिप व्हाययरल झाली आहे.

ही क्लिप व्हायरल होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आहेर यांची चांगलीच धुलाई केली. महेश आहेर यांची कथितऑडिओ क्लिप बुधवारी व्हायरल झाल्यानंतर पालिकेच्या आवारात आहेर यांना काही आव्हाड समर्थकांनी मारहाण केली. या घटनेनंतर आहेर यांना पोलिस संरक्षणामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया नौपाडा पोलिसांकडून सुरू होती.

 

या ऑडिओ क्लीपमुळे ठाण्यात खळबळ माजली आहे. ठाणे पालिकेतील प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर आणि अन्य दोघांमधील हे संभाषण व्हायरल झाले आहे. या संभाषणात महेश आहेर यांनी डॉ.जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख साप असा केला असून त्यांना ठेचण्याची भाषाही केली आहे.

याव्हायरल क्लिपमध्ये आवाज असणाऱ्या व्यक्तिचे नाव महेश आहेर असून तो ठाणे मनपातील सहाय्यक आयुक्त आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, माझ्या मुलीला शूटर मार्फत गोळ्या घालायच्या. जावयालाही भीती दाखवायची किंवा गोळ्या घालायच्या असे क्लिपमध्ये संभाषण आहे. मी बाबाजींच्या जीवावर काम करत आलो आहे,असेही ती व्यक्ती बोलत आहे. मी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल करणार नाही. कारण तक्रार दाखल करुनही काही होत नाही. फक्त चौकशीच्या नावांवर पोलीस काहीही करत नाही आणि आरोपी आपल्यासमोर फिरत असतो. मग तक्रार दाखल करुन तरी काय होणार?”, अशी उद्विग्न प्रतिक्रियाही जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून या प्रकरणाची १०० टक्के चौकशी केली जाईल. जितेंद्र आव्हाड किंवा कोणी नेता असेल त्यांना संरक्षण देऊन कोणत्याही प्रकाराची इजा होऊ नये. ही सरकारची जबाबदारी असून ती जबाबदारी चोखपणे पार पाडली जाईल,असे फडणवीस म्हणाले.

IPL_Entry_Point