मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kasba By Election : कसब्यात दुहेरी लढत; धंगेकर-रासने भिडणार, काँग्रेसने केली उमेदवारी जाहीर

Kasba By Election : कसब्यात दुहेरी लढत; धंगेकर-रासने भिडणार, काँग्रेसने केली उमेदवारी जाहीर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Feb 06, 2023 10:21 AM IST

Kasba By Election : पुण्यात कसबा निवडणुकीत भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना उमेवारी दिली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.

Kasaba By Election
Kasaba By Election

पुणे : पुण्यात कसबा मतदार संघात दुहेरी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. भाजपने स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानंतर आता काँग्रेसने देखील उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही हे देखील स्पष्ट झाले आहे.

पुण्यात कसबा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यावर पोटनिवडणूक जाहीर झाली. या ठिकाणी भाजप कडून टिळक कुटुंबीयांना उमेदवारी मिळेल अशी चिन्हे होती. मात्र, दिल्ली वरून भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले, पण त्यांना कुठल्याच पक्षाने प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, भाजपने रासने यांचे नाव जाहीर केल्यावर कॉँग्रेस कुणाला उमेदवारी देणार या कडे लक्ष लागून होते. कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांचे नाव चर्चेत होते. अखेर कॉँग्रेस पक्ष प्रमुखांनी धंगेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे कसबा पोट निवडणुकीत रासने विरुद्ध धंगेकर अशी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे.

रवींद्र धंगेकर हे या पूर्वी मनसेत होते. ते राज ठाकरे यांचे विश्वासू होते. मात्र, मनसे सोबत फारकत घेत त्यांनी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शिवसेनेमध्ये दहा तर मनसेतून दहा वर्षे ते नगरसेवक राहिले आहे. त्यांनी या मतदार संघात मोठी विकास कामे केली आहेत. खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक त्यांना समजले जाते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा केवळ ७ हजार मतांनी पराभव झाला होता.

 या संदर्भात नाना पटोले म्हणाले, पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून  रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. 

IPL_Entry_Point

विभाग