मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Lok Sabha 2024 : अखेर ठरलं, शिवसेना-भाजपा एकत्र लढणार, मुख्यमंत्र्यांची साताऱ्यातून घोषणा

Lok Sabha 2024 : अखेर ठरलं, शिवसेना-भाजपा एकत्र लढणार, मुख्यमंत्र्यांची साताऱ्यातून घोषणा

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Nov 05, 2023 10:15 PM IST

Eknath Shinde Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावाच्या दौऱ्यावर आहे. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

CM Eknath Shinde Live From Satara
CM Eknath Shinde Live From Satara (Hindustan Times)

CM Eknath Shinde Live From Satara : आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपातील युती कायम राहणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. साताऱ्यातील दरे या मूळ गावाच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना-भाजपाच्या युतीची घोषणा केली आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये युतीबाबत अंतिम निर्णय झाला असून आगामी सर्व निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळणार आहे.

माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली असून त्यात आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक एकत्र लढण्यावर एकमत झालं आहे. आम्ही केलेल्या कामाची पावती लोक नक्की देतील. आगामी निवडणुकांमध्ये जनता आम्हाला विजयी करून विरोधकांना सडेतोड उत्तर देणार असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राज्य शासनाकडून मराठा मुलांना फीसमध्ये सवलत देण्याचा विचार सुरू आहे. समाजातील विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल, ते सर्व करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत तिन्ही पक्ष एकजुटीने लढणार आहे. राज्यातील ४८ पैकी ४५ खासदार शिवसेना-भाजपा युतीचेच निवडून येणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. लोकसभा तसेच विधानसभेच्या निवडणुकांत जागावाटप कसं होणार?, याबाबत मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलेलं आहे. परंतु आता भाजपच्या शीर्ष नेत्यांच्या बैठकीत तिन्ही पक्षांना समसमान जागावाटप होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

IPL_Entry_Point