मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  PFI Ban In India : पीएफआय संघटनेच्या बंदीवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

PFI Ban In India : पीएफआय संघटनेच्या बंदीवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 28, 2022 11:02 AM IST

PFI Ban In India : गेल्या काही दिवसांपासून पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी केली होती.

CM Eknath Shinde On PFI Ban In India
CM Eknath Shinde On PFI Ban In India (HT)

CM Eknath Shinde On PFI Ban In India : अतिरेक्यांना पैसा पुरवल्याच्या आणि त्यांना प्रशिक्षण दिल्याचा आरोपाखाली देशभरात पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी छापेमारी केली होती. त्यानंतर आता या संघटनेवर पुढील पाच वर्ष बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला आहे. त्यामुळं आता या प्रकरणावरून राजकीय वादंग पेटण्याची शक्यता आहे. या संघटनेवर घालण्यात आलेल्या बंदीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

पीएफआयच्या बंदीवर काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

केंद्रीय गृहमंत्रालयानं पीएफआयवर घातलेल्या बंदीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं आहे. याबाबत नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घालण्याचा निर्णय योग्य आहे, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना भारतात राहण्याचा कोणताही अधिकार नाही, केंद्र आणि राज्यातील गृहखातं चांगलं काम करत असून राष्ट्रविरोधी विचार पसरवणाऱ्यांविरोधात कोणत्याही प्रकारची हयगय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी गोदावरीच्या काठावरील स्वामीनारायणाची मंदिराची प्राणप्रतिष्ठापणा केली. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

गेल्या अनेक दिवसांपासून ईडी आणि एनआयएनं देशातील अनेक शहरांमध्ये पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी केली आहे. यात आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे. टेरर फंडिंग प्रकरणात आता या आरोपींची चौकशी केली जात आहे. त्याचबरोबर या कारवाईवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची दिल्लीत बैठक झाली होती. त्यानंतर आता या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे.

IPL_Entry_Point