मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Chandrakant Patil: नीलम गोऱ्हेंच्या 'त्या' टीकेला चंद्रकांत पाटलांनी दिले उत्तर, म्हणाले…

Chandrakant Patil: नीलम गोऱ्हेंच्या 'त्या' टीकेला चंद्रकांत पाटलांनी दिले उत्तर, म्हणाले…

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 31, 2022 04:43 PM IST

Chandrakant Patil on Neelam Gorhe : विधान सभेत पुण्यातील प्रश्न उपस्थित न झाल्याने नीलम गोऱ्हे यांनी सरकारवर टीका केली होती. पुण्याला कुणी वाली राहीला नाही अशी टीका त्यांनी केली होती. आज त्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले आहे.

चंद्रकात पाटील निलम गोऱ्हे
चंद्रकात पाटील निलम गोऱ्हे

पुणे : पुण्यात आज गणरायचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शांती आणि सुखाची गणरायला मागणी करत असताना काही राजकीय फटके बाजीही अनुभवायला आली. काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अधिवेशनात पुण्याचे प्रश्न मांडले न गेल्याने पुण्याला कुणी वाली राहिला नसल्याची टीका केली होती. गोऱ्हे यांच्या या टीकेला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “नीलम गोऱ्हे यांना पुण्याचे प्रश्न सोडवण्यापासून कुणी अडवलेले नव्हते. नीलम गोऱ्हे या सभापती म्हणून स्वतःचे अधिक अधिकार वापरतात. त्यांनी त्यांचे हे अधिकार पुण्यासाठी वापरायला हवे होते. सभापतींनी सर्वांचे ऐकायचे असते. परंतू, सदस्यांपेक्षा त्याच जास्त बोलतात असा टोला पाटील यांनी गोऱ्हे यांना लगावला. पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत. सभापतींनी पक्षाचा प्रवक्ता बनायचं नसतं, तर या पक्षाचा प्रवक्ता बनतात. त्यांना पुण्याचे प्रश्न सोडवण्यापासून कुणी अडवले नव्हते. तब्बल अडीच वर्षांचं सरकार होते. या काळात त्यांनी पुण्यासाठी काय काय केले याची यादी द्यावी, असेही पाटील म्हणाले.

पालक मंत्र्याच्या मुद्यावरून पाटील म्हणाले, राज्यात पालकमंत्री नाही म्हणून काही थांबलेले नाहीत. लवकरच पालकमंत्र्यांचीही नेमणूक होईल. दोघेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री होते त्या काळातही निर्णय घेणं थांबवलेले नाहीत. नंतर मंत्रीमंडळ विस्तार झाला आणि खातेवाटपाला उशीर झाला. त्यानंतरही कोणतेही निर्णय थांबले नाही.

IPL_Entry_Point