मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Paper Leak : बुलढाणा पेपरफुटीप्रकरणी आणखी दोघे जाळ्यात; एकूण आरोपींची संख्या सातवर

Paper Leak : बुलढाणा पेपरफुटीप्रकरणी आणखी दोघे जाळ्यात; एकूण आरोपींची संख्या सातवर

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 06, 2023 10:54 AM IST

Buldhana Paper Leak Case: बुलढाणा पेपरफूटी प्रकरणी आणखी दोन मासे जाळ्यात अडकले आहेत. या प्रकरणातील आरोपींची संख्या सात वर गेली आहे.

Buldhana Paper Leak Case
Buldhana Paper Leak Case (HT_PRINT)

बुलढाणा : बुलढाणा येथे १२ वीचा गणिताचा पेपर फूटी प्रकरणी आता पर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा पोलिसांच्या हाती दोन आरोपी लागले असून या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ही ७ झाली आहे.

शकील शे. मुनाफ (रा.लोणार) आणि अंकुश पृथ्वीराज चव्हाण (रा. सावरगाव-तेली, ता. लोणार) अशी ताब्यात घेतलेल्या दोन शिक्षकांची नावं आहेत. बोर्डाच्या १२ वीच्या परीक्षा सुरू आहेत. दोन दिवसंपूर्वी गणिताचा पेपर झाला. मात्र, बुलढाणा येथे सिंधखेड तालुक्यातील एका खाजगी शाळेत गणिताचा पेपेर फुटला. गणिताच्या पेपरची दोन पाने ही व्हॉटसअपवर व्हायरल झाले होते. या घटनेमुळे खळबळ उडाली होती. दरम्यान, या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या पेपरफूटी प्रकरणी शिक्षक असल्याचे पुढे आले असून आता पर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची संख्या आतापर्यंत सातवर पोहोचली आहे. तसेच, अजून आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या पेपर फुटीचा संबंध हा थेट मुंबईतील विद्यार्थ्यांशीही असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. मुंबईतील विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये देखील गणिताच्या पेपरचा काही भाग आढळला आहे. या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांसह अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण शाखेतर्फे केला जात आहे. दरम्यान, हा पेपर पुन्हा घेणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात आल्यावर बोर्डाने हा पेपर पुन्हा घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पेपरफुटीचा मुद्द्या विधानसभेतही उपस्थित करण्यात आला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या बाबत सरकारला प्रश्न विचारला होता.

कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा

बोर्डाच्या खबरदारीनंतरही पहिल्याच दिवसापासून परीक्षेपूर्वी पेपर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. अनेक पथकांची स्थापना करूनही मोठ्या प्रमाणात कॉपी होत असल्याचे पुढे आल्याने या अभियानाचा फज्जा उडाला आहे.

IPL_Entry_Point

विभाग