मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Buldana Accident: बुलढाण्यात विचित्र अपघात, दुचाकीवरील तिघांचा आणि कारमधील एकाचा जागीच मृत्यू

Buldana Accident: बुलढाण्यात विचित्र अपघात, दुचाकीवरील तिघांचा आणि कारमधील एकाचा जागीच मृत्यू

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
May 07, 2023 10:46 AM IST

Khamgaon-Mehkar Road Accident: बुलढाण्यातील खामगाव-मेहकर मार्गावरील देऊळगाव सकर्शा गावाजवळील विचित्र अपघात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे

Road Accident
Road Accident (HT)

Buldhana Road Accident: बुलढाण्यातील खामगाव-मेहकर मार्गावरील देऊळगाव सकर्शा गावाजवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास विचित्र अपघात घडला. सुसाट वेगाने जाणाऱ्या दुचाकीने समोरच्या एका कारला धडक दिली. त्याचवेळी दुचाकीस्वरांना वाचवण्याच्या प्रयत्नात पाठीमागून येणारी दुसरी कार पलटी झाली. या अपघातात दुचाकीवरील तीन जणांचा आणि कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, शेख इरफान हुसेन, सचिन नहार आणि लक्ष्मण गवई सुसाट वेगाने दुचाकीवरून जात होते. रस्त्यात दुचाकीस्वार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी समोरील एका कारला जाऊन धडकली. मात्र, दुचाकीच्या पाठीमागून येणाऱ्या एका कार चालकाने दुचाकीस्वरांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी कार पलटी झाली.

या घटनेत एकूण चार जणांचा मृत्य झाला आहे. तर, तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रग्णालयात उपचार दाखल करण्यात आले आहे. मात्र, यातील एका व्यक्तीचे प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

IPL_Entry_Point

विभाग