मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Crime: शेतात ओंडका का टाकला? म्हणत सख्ख्या भावाने भावाला कुऱ्हाडीने ठार मारले

Pune Crime: शेतात ओंडका का टाकला? म्हणत सख्ख्या भावाने भावाला कुऱ्हाडीने ठार मारले

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Aug 13, 2022 10:00 PM IST

पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किरकोळ कारणावरून सख्ख्या भावाने आपल्या भावाचा जीव घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

pune crime
pune crime

पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात एका सख्ख्या भावाने आपल्या भावाचा किरकोळ कारणावरून कुऱ्हाडीने वर करून जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मोढवे गावात घडली.

तायप्पा मोटे असे खून झालेल्या भावाचे नाव आहे. रामा मोटे असे आरोपी भावाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार तायप्पा मोटे आणि राम मोटे हे दोघे सख्खे भाऊ आहेत. रामा मोटे यांनी शेतात जाण्याच्या रस्त्यावर लाकडाचा ओंडका टाकला होता. यामुळे तायप्पाला राग आला. यावेळी तायप्पाने रामाला आडवा ओंडका का टाकला ? असा प्रश्न विचारला. यावरुन रामा भडकला. मी मोठा आहे, मला का जाब विचारतो असे म्हणत दोघांमध्ये चांगलीच जुंपली. याच वादात रामा मोटे याने तायप्पावर कुऱ्हाडीने हल्ला केला. यात तायाप्पा जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी तायप्पाची सून लक्ष्मी महादेव मोटे यांनी वडगाव निंबाळकर पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून रामा मोटे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

या पूर्वहीही शेतात ये-जा करण्याच्या रस्त्यावर ओंडका टाकला होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद झाले होते. यावरून त्यांनी एकमेकांना मारण्याच्या धमक्याही दिल्या होत्या.

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग