मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Heartbreak fund : ब्रेकअप पडलं पथ्यावर! हार्ट ब्रेक इन्शुरन्स फंडातून तरुणाला मिळाले २५ हजार
Heartbreak insurance fund
Heartbreak insurance fund

Heartbreak fund : ब्रेकअप पडलं पथ्यावर! हार्ट ब्रेक इन्शुरन्स फंडातून तरुणाला मिळाले २५ हजार

17 March 2023, 14:31 ISTNinad Vijayrao Deshmukh

Heartbreak insurance fund : प्रेमात ब्रेकअप झाला की तरुण तरुणी हताश होत असतात. अनेकांना जगणे नकोसे होते. प्रेमभंग झाल्यावर कशात मन लागत नाही. अशाच एका प्रेमभंग झालेल्या तरुणाला हार्टब्रेक इन्शुरन्स फंडने तारले आहे.

Heartbreak insurance fund : तुम्ही आता पर्यन्त आरोग्य विमा, टर्म इनशोरन्स ऐकला असेल मात्र, एका तरुणाला चक्क प्रेमभंग झाल्यामुळे हार्टब्रेक इन्शुरन्स फंडअंतर्गत तब्बल २५ हजार रुपये मिळाले आहे. विश्वास बसत नाही ना ! पण हे खरे आहे. सध्या सोशल मिडियावर या तरुणाच्या हार्ट ब्रेकची जोरदार चर्चा सुरू असून नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

प्रेमात आजची तरुणाई आकंठ बुडाली असते. प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी तरुणांची असते. मात्र, प्रेम भंग झाला की अनेकांचा देवदास देखील होतो. अशाच एका तरुणाला त्याच्या प्रेयसिने धोका दिला. मात्र, प्रेमभंग होण्या आधी दोघांनी मिळून काढलेल्या हार्टब्रेक इन्शुरन्स फंडने या तरुणाला तारले. प्रतीक आर्यनने असे प्रेमभंग झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने या बाबत ट्विटर वर माहिती शेअर केली आहे. प्रतीक आणि त्याच्या मैत्रिणीचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, तिने त्याला धोका देत ब्रेक अप केले. ब्रेक अप होण्यापूर्वी दोघांनी मिळून एक संयुक्त खात्यात दर महा ५०० रुपये दोघांनी जमा केले. या खात्याला त्यांनी हार्टब्रेक इन्शुरन्स फंड असे नाव दिले होते. या खात्याचा करार असा होता की ज्याची फसवणूक होईल त्याला "हार्टब्रेक इन्शुरन्स फंड" मध्ये जमा झालेले सर्व पैसे मिळतील.

प्रतीकने ट्विटरवर लिहिले आहे की, माझ्या मैत्रिणीने मला धोका देत माझ्याशी ब्रेक अप केले. यामुळे मला या फंडमध्ये आम्ही जमा केलेले तब्बल २५ हजार रुपये मिळाले आहे. आम्ही जेव्हा करार केला तेव्हा हे ठरले होते की जो कुणी ब्रेक अप करेन आणि जो नात्यात प्रामाणिक असेल त्याला ही रक्कम मिळेल. त्यानुसार प्रतिकला २५ हजार रुपये मिळाले आहे.

प्रतीकने याला हार्टब्रेक इन्शुरन्स फंड म्हटले आहे. त्याने या बाबत ट्विट केले आहे. यावर तो म्हणाला हार्टब्रेक इन्शुरन्स फंडमध्ये गुंतवणूक करणे देखील मोठी जोखीम असते. मार्केट प्रमाणे यात मोठा धोका असतो. या फंडात रिलेशनशिप लोयल्टी रिस्क देखील असल्याचे प्रतीकने म्हटले आहे. यामुळे प्रेमात घेतलेल्या आणभाका या प्रामाणिक पणे पूर्ण करणे गरजेचे असते. ही पॉलिसी केवळ प्रामाणिक राहणाऱ्यांनाच मिळायला हवी, असे देखील प्रतीक म्हणतो.

प्रतीकच्या पोस्ट वर अनेक नेटकरी व्यक्त झाले आहेत. त्यांनी विविध कॉमेंट देखील दिल्या आहेत. एका युजरने प्रतीकच्या पोस्टवर लिहिले आहे की, एवढ्या मोठ्या रकमेचे तू काय करणार आहेस. त्यावर उत्तर देतांना प्रतीक म्हणाला की, ही रक्कम मी दुसऱ्या रिलेशनशिप मध्ये गुंतवणार आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, त्याने या फंडात गुंतवलेली रक्कम खूप कमी आहे. एवढ्याशा रक्कमेत कुणीही धोका देऊन जाऊ शकतो. त्यावर प्रतीकने लिहिले आहे की ही सर्व रक्कम आम्ही आम्हाला मिळालेल्या पॉकेटमनी मधून गुंतवले आहे. पुढच्या वेळी मी एक लाख रुपयांची रक्कम गुंतवणार असल्याचे देखील त्याने म्हटले आहे.

विभाग