PCMC News : पिंपरी-चिंचवड येथे महावितरणचा आकडेबहाद्दरांना दणका; तब्बल चौदाशे वीजचोऱ्या उघड
PCMC News : पुण्यात पिंपरी-चिंचवड येथे महावितरणच्या पथकाने धडक कारवाई करत तब्बल १४०० घरगुती वीज चोऱ्या उघडकीस आणली आहे. १५ आणि १६ मार्चला ही कारवाई करण्यात आली.
पुणे : पुण्यात पिंपरी चिंचवड येथे महावितरणने धडक कारवाई करत तब्बल १४०० वीज चोऱ्या उघडकीस आणल्या आहेत. बुधवारी आणि गुरुवारी ही मोठी कारवाई स्टेशनजवळील आनंदनगरमध्ये करण्यात आली. येथील नागरिक घरगुती वीज चोरी करत असल्याचे उघड झाले आहे. महावितरणच्या शाखा अभियंता कृतिका भोसले आणि त्यांच्या १७ सहकाऱ्यांनी ही कामगिरी केली. या मोहिमेत थेट तारांवर टाकलेले आकडे या पथकाने जप्त केले आहेत. दरम्यान, वीजचोरी टाळण्यासाठी येत्या १५ दिवसांत एरियल बंच केबल महावितरण लावणार आहे. या कारवाईमुळे मात्र, नवीन घरगुती वीजजोडणी घेण्यासाठी नागरिकांची रिघ महावितरणच्या कार्यालयात लागली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
भोसरी विभागातील चिंचवड शाखेअंतर्गत आनंदनगर हा परिसर येतो. या ठिकाणी ३१५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र नादुरुस्त झाले होते. दरम्यान, याची पाहणी करण्यासाठी हे पथक या परिसरात आले होते. दरम्यान, या ठिकाणी आल्यावर पथकाला मोठा धक्का बसला.
थील नागरिक थेट तारांवर आकडे टाकून वीज चोरी करत असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. तब्बल १४०० घरात वीजचोरी होत असल्याचे पुढे आले आहे. यामुळे येथील डीपी वर भार आला होता. दरम्यान, येथील सर्व वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आणि सर्व आकडे जप्त काढून जप्त करण्यात आले आहे. येथील नवे रोहित्र काही दिवसांपूर्वी नादुरुस्त झाले होते. ते दुरुस्त करण्यात आल्यावर पुन्हा दोन दिवसांतच खराब झाले.
यामुळे चिंचवड शाखेच्या सहायक अभियंता कृतिका भोसले आणि आकुर्डी उपविभाग कार्यालयाचे सहायक अभियंता शीतल किनकर व अमित पाटील यांच्यासह १७ जणांच्या पथकाने या परिसरात बुधवारी आणि मंगळवारी रात्री धाड टाकली. १० वाजता आनंदनगरमध्ये वीज चोरांविरुद्ध धडक मोहीम राबविण्यात आली.
गुरुवारी देखील ही कारवाई करण्यात आली. यावेळी थेट पोलिसांना पाचारण करण्यात आले. तबबक १४०० नागरिकांनी घरगुती वीजचोऱ्या केल्याचे उघड झाले. पुन्हा वीज चोरी टाळण्यासाठी या ठिकाणी एरियल बंच केबल लावला जाणार आहे. नागरिकांनी अधिकृत नवीन घरगुती वीजजोडणी घेण्याचे आवाहन यावेळी महावितरणने केले आहे.