मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  ED Raid : मोठी बातमी ! पुण्यात आणि छत्रपती संभाजीनगरात ईडीची छापेमारी

ED Raid : मोठी बातमी ! पुण्यात आणि छत्रपती संभाजीनगरात ईडीची छापेमारी

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 17, 2023 12:33 PM IST

ED Raid In Chhatrapati Sambhaji Nagar and Pune: ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात आणि छत्रपती संभाजीनगर शहरात छापेमारी सुरू केली आहे. पुण्यात पाच ठिकाणी तर छत्रपती संभाजी नगर येथे ईडीने नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापे घातले आहेत.

ED
ED

ED Raid In Chhatrapati Sambhaji Nagar and Pune: ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यात आणि छत्रपती संभाजीनगर शहरात छापेमारी सुरू केली आहे. पुण्यात पाच ठिकाणी तर छत्रपती संभाजी नगर येथे ईडीने नऊ वेगवेगळ्या ठिकाणी छापे घातले आहेत. दरम्यान, प्रधानमंत्री आवास योजनेसाठी काढण्यात आलेल्या निविदेत झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात येत असल्याची माहिती आहे.

पुण्यातील महमदवाडी, येरवाडा तसेच पुणे शहरात ५ ठिकाणी ईडीची मोठी छापेमारी सुरू आहे. तर छत्रपती संभाजी नगर येथे आज सकाळी ईडीने शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. ईडीच्या पथकाने शहरातील सिटी चौक पोलिसात १९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ई निविदा प्रकरणात नियम न पाळल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी निविदा काढण्यात आल्या होत्या.

यात ४० हजार घरांसाठी ४ हजार कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट देण्याबाबत ही निविदा काढली होती. रमरथ कन्ट्रक्शन, ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्विसेस आणि जग्वार ग्लोबल सर्विसेस या कंपन्यांनी भरलेली निविदा ही एकाच आयपीवरुन भरली. यात शासनाच्या अटीचा भंग केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

WhatsApp channel

विभाग