Mumbai High Court Notice to Serum मुंबई उच्च न्यायालयाने बिल गेट्स आणि सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला यांना नोटीस पाठवली आहे. कोरोना लसीच्या दुष्परिणामामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत दाखल करण्यात आलेल्या याचिका प्रकरणी उच्च न्यायालयाकडून ही नोटीस पाठवण्यात आली आहे. दिलीप लुनावत यांनी मुलगी डॉक्टर स्नेहल लुनावत यांच्या मृत्यू प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेची दखल उच्च न्यायालयाने घेतली.
न्यायाधीश गंगापूरवाला आणि न्यायाधीश माधव जामदार यांच्या खंडपीठाने अदार पूनावाला आणि बिल गेट्स यांना नोटीस पाठवली आहे. याचिका कर्त्याने नुकसानभरपाई म्हणून सीरमने १ हजार कोटी रुपये द्यावेत अशी मागणी केली आहे. दिलीप लुनावत यांनी काही महिन्यांपूर्वी ही याचिका दाखल केली होती.
दिलीप लुनावत यांची मुलगी डॉक्टर स्नेहल लुनावत या नाशिकमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत होत्या. तेव्हा त्यांनी कोविशिल्डची लस घेतली होती. लस पुर्णपणे सुरक्षित असल्याने डॉक्टर स्नेहल यांनी लस घेतली. मात्र त्यांची प्रकृती बिघडायला लागली. २८ जानेवारी २०२१ रोजी लस घेतलेल्या स्नेहल यांचे १ मार्च रोजी निधन झाले. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूटच्या चुकीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप दिलीप लुनावत यांनी केला आहे.
संबंधित बातम्या