मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  BKC: दारूच्या नशेत वरिष्ठ अधिकाऱ्याने कार चुकीच्या लेनमध्ये घुसवली; अपघातात चिमुकलीचा मृत्यू

BKC: दारूच्या नशेत वरिष्ठ अधिकाऱ्याने कार चुकीच्या लेनमध्ये घुसवली; अपघातात चिमुकलीचा मृत्यू

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 09, 2023 12:00 PM IST

BKC Road Accident: बीकेसी येथे दारुच्या नशेत एका वरीष्ठ अधिकाऱ्याने चुकीच्या लेनमध्ये गाडी घुसवल्याने एका साडेतीन वर्षाचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखणी झाले आहेत.

Crime
Crime

Road Accident: वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्समध्ये मंगळवारी दारुच्या नशेत एका वरीष्ठ अधिकाऱ्याने चुकीच्या लेनमध्ये कार घुसवल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात साडेतीन वर्षाच्या चिमुकीचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीला बुधवारी वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता ५० हजार रुपयांच्या जामिनावर त्याची सुटका करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वाती चौधरी असे या मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. स्वाती मंगळवारी संध्याकाळी ओम चौधरी (काका) आणि विनोद यादव (कारचालक) यांच्यासह बीकेसीच्या सिद्धार्थ नगर येथून जाताना समोरुन येणाऱ्या कारने त्यांना धडक दिली. या घटनेत स्वातीचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेय या अपघात ओम चौधरी यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली आहे. तर, कारचालकाची बरगडी फ्रॅक्चर झाली. त्यांच्यावर गुरूनानक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विश्वास अट्टावर अटक करून न्यायालयात हजर केले असताना ५० हजार रुपयांच्या जामीनावर त्याची सुटका करण्यात आली आहे.

स्वातीच्या वडिलांनी तिला चार महिन्यापूर्वी बिहारहून मुंबईला आणले होते. तिची धाकटी बहिण आईसोबत बिहारमध्ये राहते. स्वाती तिच्या वडील, आजी-आजोबा आणि दोन चुलत्यांसह मुंबईत राहायची. ती अंगणवाडीमध्ये शिकायची. मात्र, मंगळवारी घडलेल्या अपघामुळे तिला आपला जीव गमवावा लागला. दारु गाडी चालवणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्वातीच्या नातेवाईकाकडून केली जात आहे.

IPL_Entry_Point